Headlines

स्टेशनवर गाणे गाऊन प्रसिद्ध झालेली राणू मंडल पुन्हा जुन्या घरात का राहण्यास गेली, जाणून घ्या !

स्टेशनवर गाणे गाऊन प्रसिद्ध होणारी राणू मंडल हिने तिच्या आवाजामुळे सोशल मीडिया वरील क्वीन हा किताब स्वतःच्या नावावर करुन घेतला होता. विशेष म्हणजे हा किताब तिला तिच्या फॅन्सकडून मिळाला होता. सध्या राणू मंडल मीडियापासून दूर असून तिच्या फॅन्सना उत्सुकता लागली आहे की सध्या ती कुठे आहे आणि काय करत आहे. एक काळ असा होता जेव्हा राणू मंडल रेल्वेस्टेशनवर गाणे गाऊन स्वतःचे जीवन जगायची. मात्र तिच्या एका व्हिडिओने सर्वांना हैराण करून टाकले आणि ती एका झटक्यात फेमस झाली.
राणू मंडल चा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया ने तिला स्वतः सोबत काम करण्याची एक संधी दिली. त्यानंतर राणू मंडलची हिमेश रेशमिया सोबत दोन गाणी प्रदर्शित झाली. या गाण्यांना सुद्धा लोकांकडून खूप प्रसिद्धी मिळाली होती. मात्र सध्या असे दिसत आहे की राणू मंडल ला कोण काम देत नाही. याच कारणामुळे ती सध्या मीडियापासून दूर झाली आहे. समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार राणूमंडल सध्या तिच्या जुन्या घरी पुन्हा राहत आहे.
हो तुम्ही वाचले ते बरोबर आहे राणू मंडल सध्या तिच्या जुन्या घरात राहत असून स्वतःच्या बायोपिक वर काम करत आहे आणि याच कारणामुळे ती सध्या मीडियापासून दूर झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एक पोस्ट केली होती ज्यामध्ये याबद्दलची माहिती दिली होती. त्यात लिहिले होते की राणू मंडल बायोपिक वर काम करत असून लवकरच तिच्या आवाजाची जादू सर्वांना पुन्हा ऐकण्यास मिळेल. राणू मंडल चे तेरी मेरी कहानी हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते.
या गाण्यामुळे आणि तिच्या परिस्थितीतून आली होती या सर्व गोष्टींमुळे ती खूप प्रसिद्ध झाली होती मात्र या प्रसिद्धीचा माज आल्याचे काही व्हिडिओ मध्यंतरी खूप व्हायरल होत होते. यामध्ये राणू मंडल तिचा ऑटोग्राफ देऊ इच्छिणार्‍या एका लहान फॅन ला उर्मटपणे ओरडताना दिसत होती. तसेच मीडिया वाल्या सोबत सुद्धा ती उर्मटपणे वागत असल्याचे व्हिडीओ खूप समोर आले होते त्यामुळे सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल देखील केले गेले होते.

हे वाचा – कधी एकेकाळी वडिलांनी धूडकावून लावली होती सलमान बरोबर लग्नाची ऑफर, आता लॉक डाउनमध्ये घरात बसून करत आहे हे काम !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *