Headlines

बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्टनिस्ट अमीर खानचा गजनी २ लवकरच येणार ?

अमीर खानला बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणजे सर्व गोष्टी अगदी योग्य पद्धतीने योग्य त्या वेळी पूर्ण करणारा म्हणून ओळखले जाते. ज्या चित्रपटामध्ये ते काम करतात त्या चित्रपटातील पात्राला आपलेसे करून घेतात. नेहमी एखादा नवीन विषय घेऊन सोप्या पद्धतीने लोकांसमोर मांडणे, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. सध्या आमिर त्यांच्या लाल सिंह चड्ढा या आगामी चित्रपटाच्या कामामध्ये व्यस्त आहेत.
लाल सिंह चड्ढा हा चित्रपट हॉलीवुडमधील ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाने ६ ऑस्कर पुरस्कार जिंकले. हॉलीवुडमधील चित्रपटामध्ये फॉरेस्टचे डोके इतरांच्या तुलनेत कमी चालत असे. तरीही तो यशस्वी होतो आणि एक महापुरुष बनतो पण त्याचे खरे प्रेम, त्याची प्रेयसी त्याला सोडून जाते.
लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे आणि मिळणाऱ्या बातमीनुसार असं कळतं आहे की आमिर खान आता गजनी-२ चित्रपटामध्ये दिसणार आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत सध्या चित्रपटांचे सिक्वेल सूरु आहेत. त्यात आमिर खानचा गजनी-२ हा चित्रपट एक हिट चित्रपट ठरू शकतो.
या चित्रपटाबद्दल आमिर नाहीतर रिलायंस एंटरटेनमेंट यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील पोस्टद्वारे सांगितले. ती पोस्ट पाहिल्यानंतर आमिर खानचा हिट चित्रपट गजनीचा सिक्वेल येतं आहे अशी चर्चा सुरु झाली. रिलायंस एंटरटेनमेंटच्या त्या पोस्टमध्ये लिहले आहे की, ‘ही पोस्ट गजनीसंबंधात असणार होती पण आम्ही विसरलो की आम्हाला नेमकं काय सांगायचं आहे.’ जसं की आपल्याला माहीतच असेल की गजनी चित्रपटामध्ये आमिर खान शॉर्ट टर्म मेमोरी लॉस या आजाराने पीडित होते आणि याच बाबीचा उल्लेख या ट्वीटमध्ये केला आहे. सोबतच ट्वीटमध्ये आमिर खानला टॅगदेखील केलं आहे. पण आमिर खानकडून या ट्वीटरवर अद्याप काही मत मांडले नाही.
विक्रम वेधा रीमेकचे नाव गजनी-२ असेल, असे मानण्यात येतं आहे. गजनी चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. १०० करोड इतकी कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट सृष्टीतील चित्रपट होता. जवळ जवळ १२ वर्षांनंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *