Headlines

छोट्या फ्लॅटमध्ये मिळेल आता मोठी जागा, घरासाठी अश्या प्रकारे खरेदी करा फर्निचर !

जर आपणास सुद्धा आपल्या घरात जागेची कमतरता भासत असेल किंवा जर राहते घर आपल्या करीता पुरत नसेल पण मोठे घर हे तुमच्या बजेटमध्ये नसेल, तर आपल्या घराकरिता असे फर्निचर खरेदी करा. ज्यामुळे तुमच्या घरातील जागा जास्त व्यापली जाणार नाही आणि उत्तम फर्निचर सोबतच घरातील कमी जागेतच चांगले फर्निचरचे काम होईल.

घरात जागा कमी व्यापणारा फर्निचर – मेट्रो शहरांमध्ये छोटा-सा फ्लॅट खरेदी करणे खूप मोठी बाब आहे. सर्विस करणारे लोक आपल्या गरजांना कानाडोळा करत आपल्या घरातील जागेचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करत असतात. जर आपल्याला सुद्धा घरातील कमी जागेचे अस्तित्व जाणवत असेल तर तुम्ही आपल्या घराकरीता असे फर्निचर खरेदी करा जो मोठ्या फर्निचर सारखे सुद्धा काम करेल पण जागा कमी व्यापेल.
बेडसोबत स्टोरेजचे पूर्ण सोय – जर घरात लहान मुले असतील आणि त्यांच्या करीता आपण वेगवेगळे बेडची प्लॅनिंग करत आहात तर तुम्ही रूफ बेडिंग किंवा अपार्टमेंट बेडिंगला जास्त पसंती द्या. या बेडची विशेषता अशी असते कि यांत खाली आणि बाजूला सामान ठेवण्यासाठी विशेष अशी जागा उपलब्ध असते. सोबतच एका बेडच्या जागेत आपल्याला दोन बेड उपलब्ध होतात. तसेच अधिकतर जागेत मुलं आपल्या गरजेच्या वस्तू ठेवू शकतील.
सोफा कम रेक – आजकाल फर्निचर बाजारामध्ये मोठ्या संख्यामध्ये अश्या प्रकारचे फर्निचर तुम्हाला उपलब्ध होतील, जे आपल्याला अधिक सामान ठेवायची जागा मिळवून देऊ शकेल आणि घरात कमी जागा व्यापेलं. असे सोफे आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतात, ज्यात खाली स्टोरेजची जागा असते. हे स्टोरेज आपल्याला कुशन, सोफा कवर्स व गरजेच्या दुसऱ्या वस्तू ठेवण्याकरिता कामी येऊ शकेल.
वॉल डेस्क – तुम्ही संगणक ,लॅपटॉप व अभ्यासाकरीता वॉल डेस्क खरेदी करा. हे भिंतीत फिक्स होऊ शकते आणि छोटी खुर्ची किंवा टेबल वर बसून तुम्ही आरामात काम किंवा अभ्यास करू शकाल. यामुळे आपल्याला पूर्ण सामान ठेवायला तर जागा मिळेल सोबतच तुमची जमीन रिकामी राहील. ज्याला कधीही तुम्ही बेडिंग किंवा सिटिंग एरियाच्या रुपात वापरू शकता.
कॉफी टेबल विद नेस्ट स्टूल्स – बाजारात अनेक गोंडस लुक्स मध्ये आणि परवडणाऱ्या किमतीत असे कॉफी टेबल उपलब्ध आहेत. जे घरात खूपच कमी जागा व्यापते कारण यांच्या जागी खुर्ची ऐवजी स्टूल असतात. हे स्टूल अश्या पद्धतीने बनविलेले असतात जेणेकरून ते नंतर टेबलच्या खाली फिक्स केले जातील. यामुळें बसायला पूर्ण जागा मिळते आणि जास्त जागेची गरज सुद्धा भासत नाही. तुम्ही या कॉफी टेबलला आपल्या गोंडस फ्लॅटमध्ये जागा देऊ शकता. सोबतच याला डायनिंग साठी सुद्धा वापरू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *