Headlines

 रेड कार्पेट हा शब्द खूप वेळेस ऐकला असेल पण जाणून घ्या त्या मागची कहाणी ! 

रेड कार्पेट हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर येते ते म्हणजे झगमगत्या दुनियेतील सितारे. लांबलचक रेड कार्पेट वरून रुबाबात चालत येणाऱ्या या अभिनेता अभिनेत्री यांचा एक वेगळाच तोरा त्या सोहळ्यात पाहण्यास मिळतो. या रेड कार्पेट वरुन एकदा तरी दिमाखात चालावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु या रेड कार्पेट वरून दिमाखात चालण्याची इच्छा काही खास व्यक्तींची पूर्ण होते.

रेड कार्पेट वरून चालण्याचा सन्मान किंवा भाग्य हे काही लोकांच्या नशिबी असते. आता अभिनय क्षेत्रच नव्हे तर राजकीय, क्रीडा यांसारख्या सर्वच क्षेत्रात रेड कार्पेट चा वापर केला जातो. परंतु काही वेळा रेड कार्पेट वरून चालण्यामुळे वादही निर्माण होतात. याबाबत हल्लीच एक किस्सा समोर आला होता तो म्हणजे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह रेड कार्पेट वरून चालले होते आणि त्यामुळे त्यांना निगेटिव्ह प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले होते.
रेड कार्पेट हा काही विशिष्ट समारंभातच घातला जातो. आपण सर्वांनी बऱ्याच अवॉर्ड फंक्शनमध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या समारंभांमध्ये रेड कार्पेट घातलेले बघितले आहे परंतु ही रेड कार्पेट घालण्याची पद्धत कधीपासून सुरू झाली असेल हे तुम्हाला ठाऊक आहे का?
रेड कार्पेट हे काही खास लोकांसाठी घातले जाते हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु सर्वात पहिले या रेड कार्पेट चा वापर एका युनानी नाटकांमध्ये केला गेला होता.‌ हे नाटक तेव्हाचे आहे जेव्हा गौतम बुद्ध आणि भारताचा सर्वात शक्तिशाली राजा अजातशत्रु होता. या युनानी नाटकांमध्ये असे दाखवले गेले होते की, जेव्हा ग्रीक राजा Agamemnon युद्धासाठी जायचा त्यावेळी त्याच्या पत्नीस त्याच राज्यांमध्ये सोडून जात असे. युद्ध हे खूप काळ चालत असल्याकारणाने त्यावेळी राजा आणि त्याची पत्नी एकमेकांसोबत प्रामाणिक राहत नसत. जेव्हा राजा युद्ध जिंकून आपल्या मायदेशी परत येतो त्यावेळी त्याची राणी त्याच्या जिंकण्याच्या खुषीमध्ये त्याचे स्वागत रेड कार्पेट घालून करते. परंतु राजाने मात्र त्यावेळी सोबत एक दुसरीच महिला घेऊन आलेला असतो. त्यावेळी लाल कार्पेट वरून चालण्यास राजा नकार देतो कारण ग्रीक लोकांच्या म्हणण्यानुसार रेड कार्पेटवर केवळ परमात्माच चालू शकतो. परंतु राणीच्या सारख्या सारख्या मनवण्यामुळे राजा रेड कार्पेट वरून चालण्यास राजी होतो.
तर अशाप्रकारे हे रेड कार्पेट ग्रीस मधून सर्वत्र जगामध्ये पसरले. या रेड कार्पेट च्या सुरुवातीपासूनच्या अधिकारिक उपयोगाबद्दल बोलायचे झाल्यास रेड कार्पेट ला सर्वात आधी १८२१ मध्ये उपयोगात आणले होते. त्यानंतर अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये १९०२ ला या रेड कार्पेट चा उपयोग न्यू एक्सप्रेस ट्रेन च्या प्रवाशांसाठी केला गेला होता.
भारत आता हँडमेड कार्पेट बनवण्याच्या सुचित अग्रस्थानी आहे. परंतु हे रेड कार्पेट भारतात नक्की कधी आले हे सांगणे थोडे मुश्कील आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार भारतात रेड कार्पेट चा सर्वप्रथम वापर १९११ मध्ये इंग्रजांनी दिल्ली दरबारात केला होता. त्यावेळी दिल्लीला वायसराॅय लार्ड हार्डिनगेने किंग जॉर्ज साठी कार्पेट घातले होते.
त्यावेळी दिल्ली दरबार लाल किल्ल्यामध्ये भरवला जायचा. त्यावेळी या लाल किल्ल्यामध्ये जंगल होते ते साफ करून घेतले होते. व तेथे रेड कार्पेट घालण्यात आले होते. हे रेड कार्पेट किंग जॉर्ज सोबतच क्वीन मेरीसाठी सुद्धा घातले होते. आता काळाबरोबरच रेड कार्पेट खूप ठिकाणी घातलेले दिसते. मग यात राष्ट्रपती भवन असो किंवा खास विदेशी पाहुण्यांसाठी आयोजित केलेली मेजवानी अशा सर्वच ठिकाणी रेड कार्पेट घालून स्वागत केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *