Headlines

अमीर खानच्या लेकीने भावाच्या वाढदिवसानिमित असा ड्रेस घातला होता लोक चिडून म्हणाले कशाला … !

आमिर खानची लाडकी लेक आयरा खानचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला. आयराने मराठमोळ्या नुपूर शिखरेला आपला जीवनसाथी मानले आहे. आयराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने आपला सावत्र भाऊ आजाद रावसोबतचेही काही फोटो शेअर केले आहेत. फोटोत आयरा फारच गोड दिसत असून ती एक राजकुमारी असल्याचा भास होत आहे.

आयराच्या साखरपुड्याला आमिर खान, किरण राव, आजाद राव खान आणि फातिमा सना शेखसोबत आणखी काही खास पाहुणे उपस्थित होते.

आयराने आपल्या सावत्र भावासोबत एक गोड फोटो शेअर केला आहे. त्यात आयराने आपल्या लाडक्या भावाला मिठीत घेतलेले पाहायला मिळते. आजादने आकाशी रंगाचा फॉर्मल सूट आणि त्यात पांढरा शर्ट घातला आहे.

आयराने वेगवेगळ्या अंदाजातील आपल्या खास दिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही फोटोत आयरा पाहुण्यांसोबत डान्स करत आहे. तिने लाल रंगाचा गाऊन हातात घड्याळ तर दुसऱ्या हातात ब्रेसलेट घातले आहे.

हे फोटो शेअर करत आयराने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी स्वताला कधीच एवढे सुंदर समजले नाही. पण त्या दिवशी मी समजले होते. मला एक राजकुमारी असल्यासारखे वाटत होते. माझे फोटो कोणत्याही बाजूने , कशाही हावभावासहित काढले तरी त्यात मी सुंदरच दिसेन असे मला वाटत होते आणि तेच झाले.

आयराच्या फोटोवर जैन खान याने कमेंट केली की, तू खूप सुंदर आहेस. त्यादिवशी माझी तुझ्यावरुन नजर हटत नव्हती. तर एका चाहत्याने लिहिले की, तू खूपच सुंदर दिसत आहेस. लाल रंग तुझ्यावर उठून दिसतोय. तर आणखी एकाने लिहिले गुलाबासारखी दिसत आहेस. तर खूपजण आयराच्या पोस्टवर हार्टचे इमोजी पोस्ट करत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !