Headlines

दीपिकाच्या या कारणामुळे रणवीर झाला आहे त्रस्त !

बॉलिवुडचे हॉट आणि सगळ्यात क्युट कपल म्हणून ओळखले जाणारे दिपविर चे जोडपे म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह. हे दोघे नेहमी कोणत्या ना कोणत्या पार्टी किंवा इव्हेंट मध्ये दिसून येतात. सध्या हे दोघेही आपापल्या कामामध्ये खूप व्यस्त दिसून येतात. रणवीर सध्या त्याच्या प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या ‘८३ ‘ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच मध्ये व्यस्त आहे तर दीपिका तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोशूट मध्ये व्यस्त आहे.
दीपिकाने हल्लीच इंटरनॅशनल मॅगझिन ‘ एल ‘ साठी फोटोशूट केले. हे फोटो तिने तिच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट केले आहेत. हे फोटो बघताच क्षणी तुमचा श्वास रोखला जाऊ शकतो. इतके हे फोटो बोल्ड आणि हॉट आहेत. परंतु दीपिकाचे असे हॉट आणि बोल्ड फोटो बघून तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच रणवीर सिंहच्या डोक्याला ताप झाला आहे.
रणवीर ने त्याचा हा त्रास दीपिकाच्या फोटोवर कमेंट करून सर्व जगाला बोलून दाखवला आहे. या मॅगझिन साठी करण्यात आलेल्या फोटोशूट मध्ये दीपिका समुद्र किनाऱ्यावर पोज देताना दिसते. दीपिका या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने हे फोटो इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केले आहे. या फोटोवर रणवीर सिंह ने एक गोड कमेंट केली आहे ‘ बेबी रहम करो यार !’
रणवीर सिंह सोशल मीडिया असो किंवा इव्हेंट नेहमीच आपल्या पत्नीची म्हणजेच दीपिका च्या सुंदरते कौतुक करत असतो. दीपिकाने इंस्टाग्राम वर अजूनही काही फोटो शेअर केले आहेत. पुढील प्रोजेक्ट बद्दल बोलायचे झाल्यास लग्नानंतर दीपिका आणि रणवीर पहिल्यांदाच एकत्र ८३ या चित्रपटात दिसतील. या चित्रपटात दीपिका रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल. रणवीर या चित्रपटात क्रिकेटर कपिल देव यांची भमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत ११ मार्चला एका ग्रँड इव्हेंट मध्ये लॉन्च केला जाईल. हा चित्रपट १० एप्रिल ला प्रदर्शित होईल.
तर दीपिका धर्मा प्रोडक्शन च्या पुढील चित्रपटाच्या तयारीस लागली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. या चित्रपटचे दिग्दर्शन शकुन बत्रा करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *