Headlines

या कारणामुळे कुणाल खेमू खेळला तब्बल बारा वर्षानंतर होळी !

बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू अधिकतर चर्चेमध्ये राहत नाही. पूर्वी कुणाल खेमू चे चित्रपट खुप चालायचे परंतु आता ते इतके खास चालत नाहीत. परंतु सध्या होळीच्या निमित्ताने एका वेगळ्याच कारणामुळे कुणाल खेमू चर्चेत आला आहे. तर त्याचे झाले असे की, गेली बारा वर्षे कुणाल होळी खेळली नाही.परंतु यावर्षी बारा वर्षानंतर कुणालने होळी खेळली आणि याचे संपूर्ण श्रेय जाते ते म्हणजे त्याच्या लेकीला इनायाला. कोण आलय सोशल मीडियावर पोस्ट करत हे स्वतः कबूल केले आहे की तो बारा वर्षानंतर त्याच्या मुलीसाठी होळी खेळला. कुणालच्या चाहत्यांनी त्याची ही पोस्ट लाईक सुद्धा केली आहे.
होळीच्या निमित्ताने कोणाले त्याच्या इंस्टाग्राम वर लिहिले आहे की धन्यवाद मुलांनो, तुमच्यामुळे मी पुन्हा रंग आणि आनंदामध्ये परत आलो. तुमच्यामुळे पुन्हा एकदा मला माझे बालपण आठवले. मी मागील बारा वर्षांपासून होळी खेळली नाही आणि मी असेच समजत होतो की यापुढेही मी होळी खेळणार नाही परंतु माझ्या मुली मुळे मी तिच्या मित्रांच्या होळी पार्टी मध्ये गेलो आणि होळी खेळण्याचा आनंद लुटला. कुणाल नेत्याच्या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कुणालच्या हातामध्ये रंगाची एक प्लेट आहे आणि या प्लेट मधून येणा-या आणि तैमुर रंग घेत आहेत.
कुणाल सोबतच सोहा अली खान ने सुद्धा इनाया सोबत इंस्टाग्राम वर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये येणा-या तिच्या आई-वडिलांना रंग लावताना दिसते. या पोस्ट द्वारे सुहाने सर्वांना हॅपी होली म्हटले आहे. काही गोष्टी जर तुम्ही विसरू शकत नसाल तर हाच योग्य वेळ आहे त्या गोष्टी विसरण्याचा आणि सर्वत्र सुख पसरवण्याचा असा संदेश तिने या पोस्ट द्वारे दिला आहे.
कुणाल च्या फिल्मी करिअर बद्दल बोलायचं झाल्यास कुणाला सर्वात शेवटी मलंग या चित्रपटांमध्ये दिसला होता. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर दिशा पठाणी आणि अनिल कपूर हेसुद्धा मुख्य भूमिकेत होते. याआधी कुणाल वरूण धवन आलिया भट संजय दत्त आदित्य रॉय कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या कलंक या चित्रपटांमध्ये सुद्धा दिसला होता.
कुणालचे २०१५ मध्ये सैफ अली खानच्या बहिणीशी म्हणजेच सोहा अली खान सोबत लग्न झाले होते. त्यानंतर तो गोलमाल सीरिजमध्ये दिसला होता. Zee5premium च्या अभय या वेब सिरीज मध्ये कोणाला मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते. आता या वेब सिरीज चा दुसरा भाग चित्रित केला जात आहे. याबद्दलची माहिती खुद्द नेत्याचे इंस्टाग्राम अकाउंट वरून त्याच्या चाहत्यांना दिली आहे. कुणाला बाईक्स चालवायचा खूप शोक असल्याचे त्याच्या पोस्टवरून दिसून येते. त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक महागड्या बाईक आहेत. शूटिंग मधून वेळ मिळाला की तो नेहमीच त्याच्या मित्रांसोबत बाईक्स लॉंग ड्राईव्हला जात असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *