Headlines

लग्नाआधी अजय देवगन किंवा शाहरुख नव्हे तर हा अभिनेता होता काजोलचा क्रश !

लॉक डाऊन दरम्यान प्रत्येक सेलिब्रिटी टाईमपास करण्यासाठी कोणते ना कोणते आपली आवडती काम करत आहेत. अजय देवगन आणि काजोल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि सदा चर्चेत असणारे कपल आहे. हे दोघे जोडीने कोठेही गेले तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्यावर चर्चा होतेच. पण तुम्हाला ठाऊक आहे का जर काजोल अजयच्या प्रेमात पडली नसती तर तिचा पहिला क्रश कोण होता ? जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.
अजय देवगण च्या प्रेमात पडण्याआधी काजोलचे आधी वेगळ्याच अभिनेत्यावर क्रश होते. हे स्वतः अभिनेत्री काजोल ने एका टिव्ही शो मध्ये सांगितले होते. या शो दरम्यान बॉलिवुड मधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर ने सांगितले होते की मुंबईत होणाऱ्या एका इव्हेंट मध्ये काजोल ने तिच्या क्रशला पाहण्यासाठी तिने एक मिशन बनवले होते. तिचा हा क्रश दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार होता.

हे वाचा – अशी होती रोहित शर्माआणि रितिका सजदेहयांची लव स्टोरी, युवराज सिंगने केली मध्यस्थी !करण जोहर ने सांगितले की तिच्या या मिशन मध्ये ते सुद्धा तिला मदत करत होते. परंतु खूप प्रयत्न करून देखील ते अक्षय कुमारला शोधू शकले नाही. पण यात एक फायदा झाला तो म्हणजे काजोल आणि करण जोहर मधील मैत्री अधिक घट्ट होत गेली. जी अजुन सुद्धा घट्ट आहे.

हे वाचा –  आता इम्रान हाश्मीरोमॅन्स करताना दिसणार टॉलीवूडमधील या अभिनेत्रीसोबत, जाणून घ्या कोण आहे ती !काजोल आणि करण जोहरच्या मैत्री च्या चर्चा बॉलिवुड मध्ये नेहमी होत असतात. करण जोहरच्या अनेक चित्रपटात काजोल ने काम केले आहे. या चित्रपटात कुछ कुछ होता है, माय नेम इज खान, कभी खुशी कभी गम यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली. शिवाय हे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले.

हे वाचा – एका चाहत्याने मालिकेतली भूमिका पाहून चक्क सिगारेट सोडून दिली, वाचा नक्की किस्सा काय आहे !

एवढेच नव्हे तर या चित्रपटांत काजोलची जोडी शाहरुख खान सोबत दिसली होती. पुढे ही जोडी सुपरहिट ठरली. शाहरुख खान सुद्धा करण जोहर चा खास मित्र आहे. काजोल शेवटी तानाजी या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अजय देवगण ने तानाजी ची भूमिका साकारली होती तर काजोलने तानाजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका केली होती.

हे वाचा – डिज्नी चैनल वरील सहा बाल कलाकार आता कसे दिसतात ? यातील एक आहे करोड रुपयांची मालकीण !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *