सलमान सोबत भांडण तरीही बॉलिवूड मध्ये घडवले करिअर, बऱ्याच वेळा सलमानची माफी मागण्याचा करतो प्रयत्न !

4410

बॉलिवुडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खानच्या स्टारडम बद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. बॉलीवूड मध्ये सलमान खान ला मोठ्या मनाचा माणूस म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की सलमान खानने अनेक जणांना रातोरात सुपर स्टार बनवले. पण जर कोणी सलमान खान सोबत पंगा घेतलाच तर त्या कलाकाराच्या किंवा त्या व्यक्तीच्या यशाचे रस्ते बंद होतात.
तो व्यक्ती जरी प्रसिद्ध असला तरी त्याचे करीयर संपुष्टात येते. सलमान खानशी पंगा घेणाऱ्यांच्या यादीत बॉलिवुड मधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंह चा सुद्धा नंबर लागतो. चला तर मग जाणून घेऊ नक्की कोणत्या कारणावरून यांच्यात बिनसले होते.
एका अवॉर्ड सोहळ्यात सलमान खान सूत्रसंचालन करत होता. त्याच अवॉर्ड शो मध्ये अरिजीत सिंहला त्याच्या सुरेल गायनासाठी पारितोषिक मिळणार होते. जेव्हा पारितोषिक विजेता म्हणून अरिजीत सिंहचे नावं घोषित केले तेव्हा तो त्याला स्टेज वर पोहचण्यास थोडा उशीर झाला. त्यामुळे मजेत सलमान खानने अरजीतला म्हटले की तू झोपला होतास का ? तर या प्रश्नावर अरिजीत सिंह ने उत्तर दिले की हो तुमच्यामुळे झोपून गेलो. सलमान खान ला त्याचे हे उत्तर बिलकुल आवडले नाही.

हे वाचा – तुमच्या या आवडत्या अभिनेत्रीं बद्दल या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील !

अरिजीत चे ते उत्तर त्याला पुढे खूप भारी पडले. एवढेच नव्हे तर सलमान खान ने मोठमोठ्या निर्मात्यांना देखील अट घातली की पुढे ज्या चित्रपटांत अरिजीत सिंह गाणे गाणार असेल त्या चित्रपटात सलमान खान काम करणार नाही.
सलमान खानशी पंगा घेतल्यावर अनेक स्टार्स चे करीयर बुडाले आहे. मात्र अरिजीत सिंह च्या आवाजाची जादू प्रेक्षकांवर कायम आहे.
हे वाचा – चित्रपटात यश मिळायला लागल्यानंतर या अभिनेत्रीने साखरपुडा मोडून सोडले तिच्या बॉयफ्रेंडला !
अनेक चित्रपटात त्याने सुपर हिट गाणी गायली आहेत. एवढेच नव्हे तर त्याला त्याच्या उत्कृष्ट गायनासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्याच्या अनेक गाण्यांना यु ट्यूब वर मिलियन च्या वर व्ह्युज सुध्दा मिळाले आहेत. तरुण वर्गात अरिजीत सिंहच्या गाण्यांची क्रेझ खूप आहे.

हे वाचा – शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारबद्दल केलेला खुलासा वाचून तुम्हाला पण धक्का बसेल !एवढे सर्व असून देखील अरिजीत सिंह सलमान खानला मनवण्याचा प्रयत्न करत असतो. यावरूनच समजून येते की या दोघांमधील दुष्मानी अजुन संपलेली नाही. एका इव्हेंट मध्ये सलमान खानने अरिजीत सिंहच्या आवाजाची नक्कल करून एक गाणे गायले होते. अरजीत सुद्धा सलमान खानची माफी मागण्याचा खूप प्रयत्न करत असतो. सध्या थोड्याफार प्रमाणात भांडणं मिटल्याच्या चर्चा आहेत परंतु अधिकृत वृत्त आलेले नाही.

हे वाचा – चित्रपटात यश मिळायला लागल्यानंतर या अभिनेत्रीने साखरपुडा मोडून सोडले तिच्या बॉयफ्रेंडला !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !