Headlines

डिज्नी चैनल वरील सहा बाल कलाकार आता कसे दिसतात ? यातील एक आहे करोड रुपयांची मालकीण !

आपले सर्वांचे लहानपण डिजनी चॅनेल वरील कार्यक्रम बघण्यातच गेले असेल. त्यावरती छोट्या कलाकारांची आपल्याला खूप आवड असायची. आज आम्ही तुम्हाला डिज्नी चैनल च्या त्या ६ बाल कलाकारांबद्दल सांगणार आहोत. जे आता खूप बदलले आहेत.
१) उमंग जैन –
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री उमंग जैन ही २००७ मध्ये डिज्नी चैनल वरील ब्रेक टाइम मस्ती टाईम या कार्यक्रमात महुआ हे पात्र साकारायची. ही अभिनेत्री आता पंचवीस वर्षांची झाली असून तिने महारक्षक देवी, खटमल ए इश्क, आणि एकदा चंदर एक थी सुधा यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
२) सानिया अंकलेरिया –
अभिनेत्री सानिया अंकलेरिया हिने डिज्नी चैनल वरील द सूट लाइफ ऑफ करण अॅंन्ड कबीर (२०१२) आणि बेस्ट ऑफ लक निकी (२०११)या दोन प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. आज सानिया १७ वर्षांची झाली असून सध्या ती टीव्ही दुनियेपासून खूप काळ दूर आहे.
हे वाचा – बजरंगी भाईजान चित्रपटातील आईचे पात्र निभावणारी अभिनेत्री खरी कशी दिसते पहा !
३) तारा सुतारिया –
२०१९ मध्ये आलेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर २ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया हिने डिज्नी चैनल वरील बिग बडा बुम (२०१०) , बेस्ट ऑफ लक निकी (२०११) , द सुट लाईफ करण अँड कबीर (२०१२) आणि ओय जस्सी(२०१३) यांसारख्या कार्यक्रमात काम केले होते आता ती 24 वर्षांची झाली आहे.
४) आयशा कादुस्कर –
डिज्नी चैनल वर २०१२ मध्ये प्रसारित होणारी मालिका द सूट लाइफ ऑफ करण ऍन्ड कबिर मध्ये बिन्नी कुकरेजा हे पात्र साकारणारी अभिनेत्री आयशा कादुस्कर आता खूप बदलली आहे. २३ वर्षीय आयशा कादुस्कर सर्वात शेवटी ये उन दिनों की बात है या मालिकेत दिसली होती.

हे वाचा – मेकअपचा तिरस्कार करते हि अभिनेत्री पण दिसायला आहे खूपच सुंदर !

५) अहसास चन्ना –
४ वर्षाची असताना फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारी अभिनेत्री अहसास चन्ना हिने वास्तुशास्त्र, फूंक आणि ओ माय फ्रेंड गणेशा यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त अहसासने २०१३ मध्ये डिज्नी चैनल वरील ओय जस्सी या मालिकेत आयेशा हे पात्र साकारले होते. आता ती वीस वर्षांची झाली आहे.
६) तनिषा शर्मा –
इंटरनेट वाला लव या मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री तनिषा शर्मा हिने २०१६ मध्ये डिज्नी चैनल वरील गब्बर पूंछवाला या मालिकेत सान्या ही भूमिका साकारली होती. सध्या १८ वर्षांची असलेली तनिषा शर्मा ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका इश्क शुभानल्ला मध्ये काम करत आहे.

हे वाचा – जाणून घ्या तुमचे आवडते कलाकार लॉकडाउनच्या काळात काय करतात !

७) मिली सायरस –
२००८ मध्ये डिज्नी चैनल वरील सर्वात लोकप्रिय मालिका हैना मॉन्टेना मधून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणारी मिली सायरस ही आजच्या घडीला अमेरिकेमधील एक फेमस सिंगर आणि सॉंग राईटर आहे. २७ वर्षांची असलेली मिली सायरस ही जगभरात टॉप ५ मध्ये सर्वात कमी वयात श्रीमंत कलाकारांमधील १ म्हणून ओळखली जाते. तिच्याकडे आता १६० मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल ११३० करोड रुपये इतकी संपत्ती आहे.

हे वाचा – विद्या बालनची बहीण आहे तिच्यापेक्षा सुंदर आणि बोल्ड सीन द्यायला आहे खूप प्रसिद्ध !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *