Headlines

एका चाहत्याने मालिकेतली भूमिका पाहून चक्क सिगारेट सोडून दिली, वाचा नक्की किस्सा काय आहे !

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेनंतर आता टीव्हीवर उत्तर रामायण प्रक्षेपित केले जात आहे. या उत्तर रामायणात रामाची आई सीतेचा त्याग करण्यास सांगते तिथपासून लव-कुश यांच्या जन्मापर्यंत ची कहाणी दाखवली जाणार आहे. या पौराणिक मालिकेत लवकुश हे पात्र ज्यांनी निभावले होते ते कलाकार आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
गमतीची गोष्ट म्हणजे कुश हे पात्र करणार्‍या कलाकाराने श्रीकृष्णाचे सुद्धा पात्र केले होते. या दोन्ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव आहे स्वप्निल जोशी. आज आम्ही स्वप्निल जोशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत श्री कृष्णा शी निगडीत आहे.
या मालिकेशीसंबंधित असलेल्या आठवणींचे किस्से सांगताना एका मुलाखतीत स्वप्निल जोशी ने सांगितले कि जेव्हा मी कॉलेजच्या फर्स्ट इयरला होतो तेव्हा माझा एक चाहाता माझ्याकडे आला. अचानक तो माझ्या पाया पडला आणि रडायला लागला. त्यावेळची ती सिच्युएशन खुप अजीब होती. स्वप्नीलने सांगितले की त्या व्यक्तीने सांगितले कि तो एक चेन स्मोकर होता पण त्याने सिगरेट यासाठी सोडली कारण तो देवाला घाबरायचा.

हे वाचा – अशा प्रकारे मुकेश खन्ना यांना मिळाला होता महाभारत मालिकेत भिष्मचा रोल !जेव्हा तो सिगारेट ओढायला घ्यायचा तेव्हा त्याच्यासमोर माझ्या रूपात श्रीकृष्णाची प्रतिमा उभी राहायची. ही घटना खरंच थोडी अजीब होती पण त्यावेळेस ती मला भाऊक करून गेली. स्वप्नील जोशीने उत्तर रामायण मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले होते.
त्यावेळी स्वप्निल जोशी चा चेहरा इतका मासुम होता की रामानंद सागर यांनी त्याला पाहताक्षणी श्रीकृष्ण बनवायचे ठरवले. या रोल मधून प्रेक्षकांचे भरपूर प्रेम स्वप्निल ला लाभले. त्यानंतर श्रीकृष्णाचा रोल सर्वदमन बॅनर्जी यांनी केला. ही मालिका १९९३पासून ते १९९६ पर्यंत प्रसारित व्हायची. श्रीकृष्णाची भूमिका केल्यानंतर स्वप्निल जोशीचे आयुष्य रातोरात बदलले.

हे वाचा – अख्या जगाला हसवणाऱ्या अवलिया बद्दल जाणून घ्या, सेलिब्रिटी पण इच्छुक असतात याला भेटायला !

हे वाचा – एका आइटम सॉंगमुळे जॅकलीन फर्नांडिसला परदेशात पळून जावे लागले होते, बघा नक्की काय आहे प्रकरण !

श्रीकृष्ण ही भूमिका पार पडल्यानंतर स्वप्निल जोशी बरेच काळ पडद्यापासून दूर होता. या दरम्यानच्या काळात त्याने संपूर्ण लक्ष त्याच्या अभ्यासावर केंद्रित केले. या मालिके व्यतिरिक्त स्वप्निलने अनेक चित्रपट व सिरीयल मध्ये काम केले आहे.
स्वप्निल ने दील विल प्यार व्यार, हद कर दी, भाभी, देश मे निकला होगा चाँद, हरे कांच की चुडिया यांसारख्या मालिकेत काम केले. याशिवाय मराठी इंडस्ट्रीतील अनेक मालिका व चित्रपटात स्वतःचे नाव कमावले.

हे वाचा – कधी एकेकाळी वडिलांनी धूडकावून लावली होती सलमान बरोबर लग्नाची ऑफर, आता लॉक डाउनमध्ये घरात बसून करत आहे हे काम !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *