हि सुंदर मुलगी आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल ! 

1491

हिंदी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री या त्यांच्या अभिनयावरून ओळखल्या जातातचं पण त्यांच्या सौंदर्यामुळे देखील अनेकांच्या पसंतीस उतरतात. हिंदी चित्रपटांमध्ये इतर प्रसिद्ध अभिनेत्रींच्या मानाने फार कमी काम करून ही आपली छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे जुही चावला होय. काही काळापासून जुही चित्रपटांमध्ये फार कमी दिसली आहे. जुही चावला तर सुंदर आहेतच पण सोबतच तिची मुलगी देखील फार सुंदर आहे.

आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये प्रत्येक पात्र फार खुबीने जुहीने पार पाडले आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीला मागे सोडत व्यावसायिक जय मेहता यांच्यासोबत लग्न केले. जुही चावला हिला आता २ मुलं आहेत. मुलीचं नाव जान्हवी मेहता असून तिचा जन्म २१ फेब्रुवारी २००१ साली मुंबईमध्ये झाला. जान्हवी आता १८ वर्षांची झाली आहे.
ती दिसायला खूप सुंदर आणि सालस आहे. तिने धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूल या शाळेमधून तिने शिक्षण पूर्ण केले. जान्हवी ही ग्लॅमर आणि चित्रपटसृष्टीपासून लांब राहणं पसंत करते. जुही चावलाच्या मते, जान्हवी हिंदी चित्रपट सृष्टीत नक्की पाऊल ठेवेल. पण फार कमी वेळेस जान्हवी ला आपल्या आई-वडिलांसोबत पाहिले जाते.
जान्हवीला या चित्रपटाच्या दुनियेत फारसा रस नाही. ती पूर्णतः तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू पाहते. ती आयुष्यात काहीतरी करून दाखवू इच्छिते. सध्या ती लंडनमध्ये आपले पुढील शिक्षण घेत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.