टीव्ही जगतात सगळ्यात प्रसिद्ध असलेली रामायण मालिका ३३ वर्षानंतर पुन्हा दूरदर्शनवर प्रसारित होऊ लागली आहे. पूर्वी या मालिकेची लोकप्रियता तर होतेच. पण इतक्या वर्षानंतर सुद्धा या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. दूरदर्शनने सध्या टीआरपीची नवी उंची गाठली आहे यावरूनच या मालिकेची लोकप्रियता लक्षात घेता येते.
रामानंद सागर यांनी रामायणाचे ७८ एपिसोड केले होते या ७७ एपिसोड साठी ५५० दिवसांचे चित्रीकरण करावे लागले होते. असे बोलले जाते की रामायण मालिकेचा चित्रीकरणाचा वेळ हा निश्चित नसायचा. या मालिकेची तासनतास शूटिंग चालू असायची. रामायण मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरी यांनी शूटिंगच्या वेळी च्या गमती जमती शेअर केल्या.
सूनील लाहरी याने सांगितले की ज्या वेळेस शूर्पणखा नाक कापण्याचा सीन चित्रीत केला जात होता. त्यावेळेस एक मजेदार घटना घडली. ज्यावेळेस शूर्पणखाचे नाक कापण्याचा सीन शूट होत होता. त्यावेळेस सीनची गंभीरता लक्षात घेऊन संपूर्ण सेटवरील माहोल एकदम शांत झाला होता.
रामायण मालिकेत जामवंत ही भूमिका साकारणारे अभिनेता या गोष्टीमुळे पुन्हा आले चर्चेत !
आणि अचानक मागून घोरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज मालिकेच्या एका क्रू मेंबर्स होता. जो सततच्या शूटिंगमुळे झोप पुर्ण झाली नसल्याने सेटवरच झोपून गेला होता. त्यामुळे गंभीर वातावरणात अचानक हास्याचे वातावरण निर्माण झाले होते.
Bollywood Updates On Just One Click