Headlines

बॉलिवूडमध्ये येण्यासाठी या अक्टर्सनी सोडल्या या मोठया-मोठ्या नोकऱ्या, जाणून थक्क व्हाल !

बॉलीवूड मध्ये टॅलेंटेड आणि हुशार कलाकारांची कमी नाही. यामध्ये असेही काही कलाकार आहेत त्याचे फक्त अभिनयातच नव्हे तर दुसऱ्या कामांमध्ये सुद्धा खूप हुशार आणि तरबेज आहेत. यामध्ये काही कलाकार तर खूप शिकलेले सुद्धा आहेत आणि चांगल्या डिग्री ने क्वालिफाईड आहेत. मात्र स्वतःचे अभिनयाची आवड जोपासण्यासाठी त्यांनी त्यांच्या नोकरीवर पाणी सोडले आणि बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
आज हे कलाकार जर बॉलिवूडमध्ये नसते तर नक्कीच कुठेतरी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सफल झाले असते. पण नोकरीवर पाणी सोडून देखील आता बॉलिवूडमध्ये हे कलाकार टॉप पोझिशनला आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच कलाकारांबद्दल माहिती सांगणार आहेत ज्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या आवडीसाठी नोकरी सोडली.
१) विकी कौशल –
बॉलीवूड स्टार लिग मध्ये सहभागी असलेल्या विकी कौशल स्वतःच्या पर्सनलिटी आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिवसेंदिवस चाहता वर्ग वाढत चालला आहे. विकी कौशल चे एज्युकेशन बॅकग्राउंड सुद्धा खूप छान आहे.
विकीने २००८ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले. त्यांनी विकीला अनेक कंपन्यांमधून चांगल्या प्लेसमेंट सुद्धा मिळाल्या होत्या. मात्र स्वतःच्या अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकीने इंजिनिअरिंग सोडली. त्याने त्याच्या अभिनयाची सुरुवात थिएटर पासून केली होती तेथे त्याला बरेच काही शिकण्यास मिळाले. त्यानंतर त्याला मसान या चित्रपटामुळे ब्रेक मिळाला. मात्र खरी लोकप्रियता विकीला उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाने मिळवून दिली.
२) परिणीती चोप्रा –
बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री मध्ये परिणीती चोप्रा तिच्या चुलबुल्या अभिनयासाठी ओळखली जाते. परिणितीने बॉलिवूडमध्ये इशकजादे या चित्रपटांमधून पदार्पण केले होते. तिचा पहिलाच चित्रपट बॉलीवूडमध्ये हिट ठरल्याने ती प्रसिद्धीच्या झोतात आली. परीणीतीकडे फक्त लुक आणि अभिनय कौशल्य नव्हे तर शिक्षण ही खूप चांगले आहे.
तिने मंचेस्टर बिझनेस स्कूल इन लंडन मधून बिझनेस, इकॉनॉमिक्स आणि फायनान्स मध्ये ट्रिपल ओनर्स डिग्री घेतली आहे. त्यानंतर परिणीतीने यशराज स्टुडिओमध्ये पब्लिक रिलेशन कन्सल्टंट म्हणून काम केले होते. याशिवाय तिने मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये इंटरंशिप साठी अप्लाय सुद्धा केले होते.

हे वाचा – विक्की कौशलने जेव्हा सलमान खानच्या समोरच कॅटरिनाला घातली लग्नाची मागणी !

३) रणवीर सिंह –
रणवीर सिंह मध्ये जो बॉलिवुडचा किडा आहे तो आपल्याला त्याच्या अभिनयातून स्पष्ट दिसून येतो. रणवीरला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण अभिनयाची आवड जोपासताना त्याने कधीच अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. रणवीरने मुंबईच्या एच आर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून शिक्षण घेतले.
त्यानंतर बॅचलर शिक्षण पूर्ण करण्यासाठी रणवीर ब्लुमिंग्टन् येथील इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये गेला. रणवीरने ओएंडएम आणि जेडब्ल्यू टी यांसारख्या ऍड एजन्सीमध्ये कॉपीरायटर म्हणून काम केले आहे. त्यानंतर बँड बाजा बरात या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
४) सोनाक्षी सिन्हा –
बॉलिवुडच्या दबंग गर्ल ने दबंग या चित्रपटातून सलमान खानच्या ऑपोसिट पदार्पण केले होते. आता जर सोनाक्षी चित्रपटांमध्ये नसते तर ती एक कॉस्च्युम डिझायनर असते.
सोनाक्षीने मुंबईच्या श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकर मधील विमिंज युनिव्हर्सिटीमधून डिझाइनिंग ची डिग्री घेतली आहे. सोनाक्षीने अनेक चित्रपटांमध्ये कॉस्च्युम डिझायनर आणि स्टाइलिश म्हणून काम केले आहे.
५) आयुष्मान खुराना –
टीव्ही इंडस्ट्री पासून अभिनयाच्या करिअरची सुरुवात करणाऱ्या आयुष्मान खुराना चे नाव आता टॉपच्या अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. आयुष्मानने रियालिटी शोमधून पदार्पण केले होते.
त्याआधी आयुष्मानने मास कम्युनिकेशन मधून मास्टर डिग्री घेतली होती. आयुष्मान ने रेडिओ जॉकी म्हणून करीयरला सुरूवात केली होती. अगदी काहीच काळानंतर सर्वात फेमस होस्ट म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्याला विकी डोनर या चित्रपटाने चांगली ओळख मिळाली.

हे वाचा – पहा तुमच्या आवडत्या अभिनेत्रींचे शिक्षण किती झाले आहे, वाचून विश्वास बसणार नाही !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *