Headlines

हे आहेत भारतीय विश्वातील सर्वात महागडे बातम्या सांगणारे अँकर, पगार ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल !

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. या चौथ्या स्तंभाने आतापर्यंत अनेकांचे आवाज बनण्याचे कार्य केले आहे. या क्षेत्रात काम करणारे पत्रकार मंडळी, वार्ताहर, वृत्त निवेदक असणारे अनेकांचे हा समाज घडविण्यासाठी मोलाचे योगदान असते. एखादी माहिती समाजापर्यँत पोहचवण्याचे कार्य हि मंडळी नेहमी करत असतात. एक पत्रकार बनण्यासाठी कुशल वक्ता असण्याबरोबरच चांगली बुद्धिमत्ता असणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे.

एका पत्रकाराला त्याच्या तीक्ष्ण प्रश्न आणि संयमित शब्द यासाठी ओळखले जाते. अनेक पत्रकारांनी त्यांच्या अंगी असलेल्या चातुर्य गुणधर्मामुळे लोकांच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे त्यामुळे साधारण जनता सुद्धा या पत्रकारांना सहजच ओळखतात. आज आम्ही आपणाला पत्रकारिता विश्वावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतातील सर्वात महागड्या पत्रकारांबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया त्यांच्या बद्दल !
१. बरखा दत्त – बरखा दत्त भारतातील एक प्रसिद्ध वृत्त वाहिनी एनडीटीवीचे पत्रकार आणि वार्ताहर आहेत. बरखा दत्त यांचे भारतात लाखों चाहते आहेत. त्यातील काही जण बरखा दत्त यांना चांगल्या पद्धतीने ओळखतात. बरखा यांना या क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिल्या कारणाने अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी नावाजले गेले आहे. त्यात पद्मश्री पुरस्कार, टॉक शोसाठी सर्वोत्कृष्ट निवेदक, संचालकाचा पुरस्कार आय टी ए तर्फे देण्यात आला आहे. त्यांनी या क्षेत्रात केलेले योगदान हे महिलांसाठी आज सुद्धा अभिमानस्पद मानले जाते. सुत्रांच्या माहितीनुसार बरखा दत्त यांचा वर्षाचा पगार पॅकेज हा ३ कोटी रुपये आहे.

२) अंजना ओम कश्यप – अंजना ओम कश्यप पत्रकारितेचा लोकप्रिय चेहरा मानला जातो. यांना भारतातील सर्वांत सुंदर महिला पत्रकारांच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाते. अंजना ओम कश्यप भारतातील प्रसिद्ध वृत्तवाहिनी आज तक मध्ये पत्रकारिताचे कार्य करतात तसेच टीव्ही या वाहिनीचे कार्यकारी संपादिका आहेत.
अंजना ओम कश्यप यांना पत्रकारिताच्या क्षेत्रा मध्ये अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. त्यांना हल्ला बोल आणि स्पेशल रिपोर्ट या कार्यक्रमासाठी खास ओळखले जाते. अंजना कश्यप या सुंदर महिला पत्रकार यांना वर्षाला अंदाजे २कोटी रुपये एवढे पगार मिळतो.

३. श्वेता सिंह – श्वेता सिंह सुद्धा भारतातील ओळखीचे असे लोकप्रिय पत्रकार आहेत. या दिसायला सुंदर असणाऱ्या महिला पत्रकार इंडिया टुडे मध्ये पत्रकारिताचे कार्य करत आहेत. उत्तम पत्रकारिता या करीता श्वेता सिंह यांना अनेक पुरस्कार दिले गेले आहेत. त्यांचा कार्यक्रम सौरव का सिक्सर ने २००५ मध्ये स्पोर्ट्स जर्नलिज्म फेडरेशन ऑफ इंडिया (एसजेएफआई) द्वारा सर्वश्रेष्ठ खेळ कार्यक्रमासाठी पुरस्कार जिंकला होता. श्वेता यांनी बिहर विधान सभा निवडणूक २०१५ ला पातलीपुत्र यांचा इतिहास हा कार्यक्रम सुद्धा केला होता. श्वेता सिंह यांना सुद्धा इंडिया टुडे च्या तर्फे पगाराच्या स्वरूपात चांगला वार्षिक पॅकेज दिला जातो. श्वेता सिंह यांना पगाराच्या स्वरूपात प्रत्येक वर्षी एक कोटी रुपये एवढा पगार दिला जातो.

४. रवीश कुमार – भारतात निष्पक्ष पत्रकारांचा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा रवीश कुमार यांचे नाव अग्रस्थानी येते.यांना पत्रकारिताच्या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी नावाजले गेले आहे. वाहिनीच्या प्रमुख कार्यक्रमात जसे ‘हम लोग’ आणि ‘रवीश की रिपोर्ट’ चे ते निवेदक राहीले आहेत.
रवीश कुमार यांचा प्राइम टाइम शो वर्तमान मध्ये खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे. एनडीटीवीचे के पत्रकार रवीश यांना २५ लाख रुपए महीना असा पगार मिळतो .

५. अर्नब गोस्वामी – भारतीय पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपले वेगळे व्यक्तीमत्व असणारे आणि आपल्या शैलीमुळे त्यांचे नाव नेहमी चर्चेत असते. रिपब्लिक टीवी वाहिनीचे मालक अर्णब गोस्वामी आपल्या विचारले जाणारे निर्भीड प्रश्नासाठी प्रसिद्ध आहेत.
हे सगळ्या ये भारतीय पत्रकारापैकी सर्वात जास्त कमावतात. त्यांचा पगार १कोटी रुपये प्रति महिना आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *