Headlines

३० वर्षानंतर रामायणातील लव कुश कुठे असतील? एक बनला अभिनेता तर दुसऱ्याने स्वीकारला नवीन मार्ग !

सध्या लॉक डाऊन मध्ये लोकांनी घरात बसून करायचे काय हा प्रश्न सतावत असताना दूरदर्शन वाहिनीने पुन्हा एकदा जुन्या पण लोकप्रिय मालिका पुन्हा चालू केल्या आहेत. यामध्ये रामायण, महाभारत, शक्तिमान यांसारख्या अनेक मालिकांचा समावेश आहे. तीस वर्षांपूर्वी टिव्हीवर रामायण मालिका लागायची पण या मालिकेची लोकप्रियता जरा देखील कमी झालेली नाही.
आजही प्रेक्षक तितक्याच उत्सुकतेने ही मालिका बघतात. याशिवाय प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय ती म्हणजे तीस वर्षांपूर्वी लोकप्रिय पात्र साकारणारे कलाकार आता कुठे असतील व काय करत असतील. रामायणा संबंधित अनेक कलाकारांची माहिती आम्ही तुम्हाला आधीच दिलेली आहे. तर आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत ती सितापुत्र लव-कुश यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची म्हणजेच स्वप्निल जोशी आणि मयुरेश क्षेत्रमाडेची.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ३० वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात करियर ची एकत्र सुरूवात करणारे हे दोन्ही अभिनेते आता एकदम वेगवेगळ्या मार्गावर काम करत आहेत. यातील एक तर अभिनेता झाला पण दुसऱ्याने त्याचा पेशाच बदलला. तेव्हाचे बाल कलाकार आता मोठे झाले आहेत. या भूमिका साकारणारे दोन्ही कलाकार मराठी होते हे विशेष ! रामायण मालिकेत लव ची भूमिका स्वप्नील जोशीने केली होती तर कुश ची भूमिका मयुरेश क्षेत्रमाडेने केली होती.
यातील स्वप्निल जोशी हा मराठी इंडस्ट्री मधील एक नामवंत कलाकार आहे. तर मयुरेश क्षेत्रमाडे न्यू जर्सी मधील एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करत आहे. स्वप्नील जोशी मितवा, दुनियादारी यांसारख्या अनेक चित्रपटात दिसला आहे. एवढेच नव्हे तर त्याने मालिकांमधून देखील अभिनय केला आहे.
तर मयुरेश क्षेत्रमाडे विदेशात राहत असून एका प्राइवेट कंपनीत अध्यक्ष आणि सीइओ या पदावर काम करत आहे. एवढेच नव्हे तर मयुरेश कॉर्पोरेट दुनियेतील एक नामवंत लेखक आहे. त्यांनी दोन विदेशी लेखकांसोबत मिळून स्पाईट एंड डेव्हलोपमेंट नावाचे पुस्तक सुद्धा लिहिले.
रामानंद सागर यांचा रामायाणाबद्दल बोलायचे झाल्यास जेव्हा पासून हा शो टिव्ही वर पुन्हा प्रक्षेपण केल्यापासून या मालिकेने नवीन इतिहास रचला आहे. या मालिकेने सर्व टीआरपी रेकॉर्ड मोडले आहेत. एवढेच नव्हे तर तीस वर्षांनंतर सुद्धा सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय शो ठरला आहे.

हे वाचा – रामायण मालिकेत जामवंत ही भूमिका साकारणारे अभिनेता या गोष्टीमुळे पुन्हा आले चर्चेत !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *