Headlines

ह्या दिग्गज फिल्मी घराण्यातील अभिनेत्री सोबत प्रभास लग्न करणार असल्याच्या चर्चा ? पण ..

साउथ कडील सुपरस्टार आणि हँडसम अभिनेता प्रभास काळापासून त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. बाहुबली या सिरीज पासून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या प्रभास कडे नेहमीच मुलींचे हजारो प्रपोजल येत असतात. बाहुबली चित्रपटानंतर प्रत्येक मुलीच्या मनावर त्याने जादू केली आणि मुलींना त्याचे दिवाने बनण्यास भाग पाडले.
या चित्रपटानंतर त्याच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र होऊ लागल्या. असे म्हटले जात होते की प्रभास त्याची को-स्टार अनुष्का शेट्टी सोबतच लग्न करणार आहे. पण असे मात्र काही झाले नाही. सध्या प्रभास चव्हाण अभिनेत्री निहारिका कोनीडेला सोबत जोडले जात आहे. मी तुम्हाला आज निहारिका कोनीडेला बद्दल सांगणार आहे जिचे नाव प्रभास मुळे सध्या चर्चेत आले आहे.
निहारिका ही एक कोणी सर्वसामान्य मुलगी नसून ती सुद्धा साउथ कडील सुंदर अभिनेत्री आहे. एवढेच नव्हे ती स्वतः फिल्मी घराण्यात जन्माला आली. साउथ कडील सुपरस्टार चिरंजीवी आणि कल्याण यांची निहारिका भाची आहे. तर रामचरण आणि अल्लू अर्जुन हे निहारिका चे चुलत भाऊ आहेत. अशाप्रकारे निहारीकाचे संपूर्ण कुटुंब फिल्म इंडस्ट्रीत काम करते.

हे वाचा – अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ?

२०१६ मध्ये आलेल्या तेलुगू चित्रपट ओका मनासू या चित्रपटातून निहारिका ने तेलगू इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. तसेच ती तेलुगू चित्रपट ओरू नल्ला नाल पाथू सोलरेन या चित्रपटात सुद्धा दिसली होती. गेल्या खूप दिवसापासून निहारिका चे नाव प्रभास सोबत जोडले जात आहे. त्यामुळे लवकरच हे दोघे लग्न करू शकतात अशा चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे मात्र निहारिका ने या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे.
निहारिका चे म्हणणे आहे की तिला स्वतःला माहित नाही की तिच्या आणि प्रभास’च्या लग्नाबद्दल सर्वत्र चर्चा होत आहेत. निहारिका म्हणते की माहीत नाही अशा बातम्या कुठून येतात मी तर माझ्या लग्नाबद्दल अजून विचारही केलेला नाही कारण सध्या मला फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

हे वाचा – एका आइटम सॉंगमुळे जॅकलीन फर्नांडिसला परदेशात पळून जावे लागले होते, बघा नक्की काय आहे प्रकरण !

निहारिका ने आतापर्यंत ५ चित्रपटात काम केले आहे. पण तरीसुद्धा तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. निहारिका सोशल मीडियावरील इंस्टाग्राम वर खूप ॲक्टिव्ह असते तिथे तिचे १२ लाखाहून अधिक फॉलॉवर आहेत. निहारिका च्या लग्ना बद्दल चर्चा होत असताना चिरंजीवी चे तिच्या लग्नाबद्दल चे मत पुढे आले आहे तिने एका मुलाखतीत सांगितले की निहारिका च्या कुटुंबाने अजून पर्यंत तिच्या लग्नाचा विचार केलेला नाही सध्यातरी सर्वजण तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. विशेष म्हणजे या सर्व चर्चांवर प्रभास ने कोणतेही मत व्यक्त केलेले नाही.

हे वाचा – ४ वर्षानंतर अशी दिसते बजरंगी भाईजान मधील मुन्नीतिला पाहून चकित व्हाल !

प्रभास ने साउथ कडील अनेक चित्रपटांमध्ये काम केले मात्र बाहुबली या सिरीज मुळे तो सगळ्यांच्या नजरेस आला. या चित्रपटात प्रभास सोबत दोन अभिनेत्रींनी काम केले होते या मधील एक तमन्ना होती आणि दुसरी अनुष्का शेट्टी. प्रभास ने याआधी अनुष्का सोबत दोन चित्रपटात काम केले आहे. त्यामुळेच या दोघांच्या लिंक अपच्या चर्चा समोर येत होत्या मात्र दोघांनीही या चर्चा खोट्या असल्याचे स्पष्ट केले. या दोघांच्या म्हणण्यानुसार ते दोघे फक्त मित्र आहेत.

हे वाचा – अजय सोबत नसतं जुळलं तर शाहरुख खान सोबत लग्न केले असते का ? या प्रश्नावर काजोलने दिले हे उत्तर !सध्या प्रभास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मात्र या वेळेचे कारण थोडे वेगळे आहे. कारण सध्या सर्वत्र कोरोनाव्हायरस ने हाहाकार माजला असताना प्रभास ने पीएम मध्ये तीन करोड रुपयांची मदत जाहीर केली आहे. याव्यतिरिक्त त्याने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री मदत कोशात ५०/५० लाख रुपये दान केले आहेत. लवकरच तो पूजा हेगडे सोबत प्रभास २० मध्ये दिसणार आहे.

हे वाचा – कधी एकेकाळी वडिलांनी धूडकावून लावली होती सलमान बरोबर लग्नाची ऑफर, आता लॉक डाउनमध्ये घरात बसून करत आहे हे काम !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *