Headlines

स्वतःचा बालपणीचा जुना व्हिडिओ बघून इमोशनल झाला हा अभिनेता, जाणून घ्या कोण आहे तो ?

सोशल मीडिया आता एक असे माध्यम झाले आहे जिथे कलाकारांचे चहाते त्यांच्याशी सहज कनेक्ट होऊ शकतात. कलाकारांचे वेगवेगळे फोटो, वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. अशात मध्येच कधीतरी एखादा जुना फोटो किंवा व्हिडिओ अचानक कलाकाराच्या समोर येतो आणि ते इमोशनल होतात. अभिनेता आफताब शिवदासानी सोबत सुद्धा असेच काहीसे झाले.
हा फोटो अभिनेता आफताब शिवदासानीचा लहानपणीचा आहे. सध्या कोरोनाच्या संक्रमणामुळे संपूर्ण देश लॉक डाउन झाला आहे. त्यामुळे देशातील फिल्म इंडस्ट्री व टीव्ही इंडस्ट्री स्थगित केली गेली आहे. अशावेळी टीव्हीवर दाखवायचे काय हा प्रश्न चॅनल समोर पडला होता त्यामुळे सध्या जुन्या मालिकांचे व जाहिरातींचे पुन्हा प्रक्षेपण सुरु केले गेले आहे.
आफताबने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलेली टुथपेस्ट ची एक व्हिडिओ त्याच्या एका चाहातीने त्याला टॅग करून शेअर केली. ती व्हिडिओ बघून आफताब खूप इमोशनल झाला आणि तो काळ आठवून त्याने लिहिले की तुला खूप सारे प्रेम आणि धन्यवाद !

हे वाचा – देशातील सर्वात सुंदर महिला साध्वी, जिचे सौदर्य पाहून तुम्ही हरवून जाल !आफताबने दीड वर्षाचे असल्यापासून चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. सर्वात पहिल्यांदा त्याला एका बेबी फुडच्या ब्रँडने सिलेक्ट केले होते. त्यानंतर त्याने बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केले. आफताबच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास सर्वप्रथम तो अनिल कपूरचा मिस्टर इंडिया चित्रपटांमध्ये दिसला होता.

हे वाचा – विद्या बालनची बहीण आहे तिच्यापेक्षा सुंदर आणि बोल्ड सीन द्यायला आहे खूप प्रसिद्ध !त्यावेळी तो केवळ नऊ वर्षांचा होता. त्यानंतर आफताब ने शहेनशहा या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या लहानपणाची भूमिका केली होती. याव्यतिरिक्त तो अव्वल नंबर, चालबाज आणि इन्सानियत यांसारख्या चित्रपटांमध्ये सुद्धा दिसला होता.
त्यानंतर १९९९ मध्ये असतात वयाच्या १९ व्या वर्षी राम गोपाल वर्मा यांचा चित्रपट ‘मस्त’ मध्ये लीड रोलमध्ये दिसला होता.

हे वाचा – हि सुंदर मुलगी आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल ! 

या चित्रपटात त्याच्या अपोझिट उर्मिला मातोंडकर यांनी काम केले होते. त्यावेळी तो चित्रपट खूप सुपरहीट ठरला. त्यानंतर आफताब ला बेस्ट मेल डेब्यू आणि मोस्ट प्रोमिसिंग न्यूकमर यांसारखे अवॉर्ड मिळाले.

हे वाचा – बॉलीवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’ वापरतो या ब्रँडचे शूज, किंमत पाहून विश्वास नाही बसणार !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *