Headlines

माधुरी दीक्षितच्या दोन बहिणी, ज्यांनी माधुरीला मोठं करण्यासाठी असा दाखवला मनाचा मोठेपणा !

बॉलिवूडची सदाबहार सौंदर्यवती माधुरी दीक्षित बद्दल तर आपण सर्वजण जाणतो मात्र तिच्या बहिणी आणि कुटुंबाबाबत फारच कमी लोकांना ठाऊक आहे. नुकतेच माधुरी दीक्षितने तिच्या बहिणीसोबत चा एक जुना फोटो शेअर केला आहे . ज्यात त्या दोघी शाळेतील एका स्पर्धेदरम्यान डान्स करताना दिसत आहेत. मात्र या फोटोमध्ये नक्की माधुरी कोणती आणि तिची बहीण कोणती हे ओळखणे थोडे मुश्कील आहे. आज आम्ही तुम्हाला माधुरी दीक्षित च्या दोन बहिणी रुपा आणि भारती दीक्षित यांच्या बद्दल थोडी माहिती देणार आहोत.

रूपा दीक्षित आणि भारती दीक्षित या दोन बहिणी व्यतिरिक्त माधुरीला एक भाऊ सुद्धा आहे. माधुरीच्या भावाचे नाव अजित दिक्षित असे आहे. माधुरीचे जगभरात इतके चाहते आहेत की तिच्याबद्दल विचार करताना लोक तिच्या कुटुंबाबद्दल विचार करणे विसरून जातात. याच कारणामुळे माधुरीच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती कोणाला ठाऊक नाही.

माधुरी सारख्याच तिच्या दोन्ही बहिणी सुद्धा उत्कृष्ट कत्थक डान्सर आहेत. असे म्हटले जाते की माधुरीला अभिनेत्री बनवण्यासाठी रूपा आणि भारतीने कधीच बॉलिवुड मध्ये येण्याचा विचार केला नाही. आता माधुरीच्या दोन्ही बहिणी चांगल्या सेटल झाल्या आहेत मात्र त्यांच्या बद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

माधुरी दीक्षितच्या वडिलांचे नाव शंकर दीक्षित आणि आईचे नाव स्नेहलता दीक्षित असे आहे. शंकर दीक्षित हे पेशाने इंजिनियर होते शिवाय त्यांची स्वतः ची कंपनी सुद्धा होती. सप्टेंबर २०१३ ला वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यानंतर १९९९ मध्ये लॉस एंजेलिस कलिफॉर्निया येथील श्रीराम माधव नेने सोबत लग्न केले. माधुरी दीक्षितच्या लग्नात अभिनेता दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी, बोनी कपूर आणि श्रीदेवी, अमरीश पुरी, प्रसिद्ध पेंटर एम एफ हुसैन यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

माधुरी दीक्षितचा जन्म १५ मे १९६७ ला झाला. गेल्या ३६ वर्षांपासून ती इंडस्ट्री मध्ये कार्यरत आहे. माधुरीने अबोध या चित्रपटातून पदार्पण केले होते. मात्र त्या चित्रपटाला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. मात्र या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक केले गेले. माधुरी ही अभिनेत्री सोबतच एक उत्कृष्ट नृत्यांगना सुद्धा आहे.

माधुरीने वयाच्या तिसऱ्या वर्षीच कत्थक शिकायला सुरूवात केली होती. आता माधुरी ही एक ट्रेण्ड नृत्यांगना आहे. माधुरी आणि श्रीराम यांना अरिन आणि रियान हे दोन मुलगे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *