Headlines

सलमान, विराट किंवा सनी लियोनी नव्हे तर या अभिनेत्रीला केले जाते सर्वाधिक जागतिक सर्च !

अभिनेता सलमान खान बद्दल बोलायचे झाल्यास त्याच्या इतके फॅन फॉलोइंग बॉलिवूडमध्ये कोणाचीच नसेल. पुरुष कलाकारां बद्दल बोलायचे झाल्यास सलमान खान ग्लोबली सर्च च्या बाबतीत टॉप वर आहे. तर सनी लियोनी ही दरवर्षी ग्लोबली सर्च च्या बाबतीत अभिनेत्रींमध्ये टॉप वर असते. पण आता आम्ही जी माहिती देणार आहोत ती नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटण्यास भाग पाडेल.
यावेळी सनी लियोनी आणि सलमान खानच्या पुढे कोणी तिसरी व्यक्ती गेली आहे. आणि ती व्यक्ती एक अभिनेत्री आहे. आम्ही बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा जी आता एक ग्लोबल स्टार झाली आहे.‌ यावेळी प्रियांका चोपडा ने सनीलियोनी ला सुद्धा मागे टाकले. सलमान खान बद्दल बोलायचे झाल्यास तो मात्र पुरुषांच्या यादीत अजूनही टॉप वरच आहे.

हे वाचा – एका चाहत्याने मालिकेतली भूमिका पाहून चक्क सिगारेट सोडून दिली, वाचा नक्की किस्सा काय आहे !टॉप ३ अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये प्रियंका चोपडा, सनी लियोनी आणि कॅटरिना कैफ चे नाव सहभागी आहे. या तिघींना अनुक्रमे ३९ लाख, ३१ लाख आणि १९ लाख वेळा सर्च केले गेले आहे. तर पुरुषांच्या यादीत सलमान खानला २१ लाख, विराट कोहलीला २० लाख आणि ऋतिक रोशन ला १३ लाख वेळा सर्च केले गेले आहे. ज्यावेळी ही यादी जाहीर झाली त्यावेळेस काही क्षणातच ती व्हायरल झाली. कलाकारांच्या चाहत्यांमध्ये या यादीची जोरदार चर्चा आहे. मात्र अचानक प्रियांका चोपडा ला मिळालेल्या या यशामुळे ती खूप खुश आहे.

हे वाचा –  आता इम्रान हाश्मीरोमॅन्स करताना दिसणार टॉलीवूडमधील या अभिनेत्रीसोबत, जाणून घ्या कोण आहे ती !

ग्लोबल सर्च च्या टॉप १० यादी बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये शाहरुख खान, महेश बाबु यांचा संवाद एम एस धोनीचा ही नंबर आहे. तर स्त्रियांमध्ये दिशा पठाणी, दीपिका पादुकोण आणि आलिया भट या सुद्धा यादीत सहभागी आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीतील काही कलाकार असे आहेत ज्यांना जगभरातून खूप पसंती मिळते त्यामुळे त्यांची फॅन फॉलोविंग सुद्धा खूप मोठी आहे.

हे वाचा – स्वतःचा बालपणीचा जुना व्हिडिओ बघून इमोशनल झाला हा अभिनेता, जाणून घ्या कोण आहे तो ?

प्रियंका चोपडा सर्वात शेवटी स्काय इज पिंक या हिंदी चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. प्रियंका चोपडा ने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय सिंगर निक जोनस सोबत लग्न केले. त्यानंतर ती विदेशात स्थायिक आहे.

हे वाचा – बॉलिवुड मध्ये अभिनेत्री बनण्यासाठी काय परिस्थिती मधून जावे लागले ऐका अभिनेत्रींच्याच तोंडून !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *