Headlines

‘त्याने माझा वापर केला आणि मला सोडून दिलं’, शिल्पा शेट्टीने या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याबद्दल केला होता धक्कादायक खुलासा

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार चा अफेअरची चर्चा ९० च्या दशकात खूप व्हायच्या. शिल्पा शेट्टी पासून ते रविना टंडन पर्यंत सर्वांसोबत अक्षय चे अफेअर असल्याच्या गोष्टी कानावर यायच्या. पण अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी चे प्रेम प्रकरण एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या लव्ह स्टोरी पैकी एक होते. शिल्पा शेट्टी अक्षय कुमार ची जोडी त्यावेळी खूप सुपरहिट होती शिवाय प्रेक्षक देखील त्यांना एकत्र बघण्यास पसंत करायचे. मात्र या दोघांचे ब्रेकअप झाल्यावर अक्षयने ट्विंकल खन्ना सोबत लग्न केले.

असे म्हटले जाते की शिल्पा शेट्टी अक्षय वर खुप प्रेम करायची. पण अचानक तिला असे समजले की अक्षय तिला धोका देत आहे. त्यानंतर ती संपूर्ण तुटून गेली. २००० साली शिल्पा शेट्टीने एका मुलाखतीदरम्यान अक्षय कुमार सोबतच्या ब्रेकअप से खरे सत्य सर्वांसमोर आणले.

त्या मुलाखतीत शिल्पा शेट्टीने सांगितले, ज्यावेळी अक्षय कुमार माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता त्याच वेळी तो ट्विंकल खन्नाला सुद्धा डेट करीत होता. म्हणजेच तो आम्हाला डबल डेट करत होता. ज्यावेळी ही गोष्ट समजली त्यावेळी ती या गोष्टीने खूप हैराण झाली.

‘अक्षयने केवळ माझा वापर केला. त्याच्या आयुष्यात जेव्हा दुसरी अभिनेत्री आली तेव्हा त्याने मला सोडून दिले. अक्षय केवळ एक असा व्यक्ती आहे ज्याचा मला प्रचंड राग आला आहे. कारण त्याने मला फसवले. अक्षय माझ्यासोबत जसा वागला एक दिवस त्याच्यासोबतही तसेच घडेल’ असे शिल्पा म्हणाली होती. दरम्यान शिल्पा शेट्टीच्या डोळ्यात पाणी आले होते.

शिल्पा शेट्टीने पुढे सांगितले की, तिच्यासाठी तो खूप कठीण काळ होता. पण मला आनंद आहे की मी आतून बाहेर पडू शकली. एका काळाकुट्ट रात्रीनंतर सकाळ होतेच तसेच काहीसे माझ्या आयुष्यातही घडले.

प्रोफेशनली माझ्यासोबत सर्व काही चांगले चालू होते परंतु वैयक्तिक आयुष्यात मात्र खूप सारे चढ-उतार आले. आता हे सर्व मागे राहिल्याचे पाहून खूप छान वाटते. शिल्पाने सांगितले की जेव्हा तुम्ही एखाद्यावर जीवापाड प्रेम करता आणि अचानक तुम्हाला समजते की तो व्यक्ती तुम्हाला धोका देत आहे त्या वेळेस खूप त्रास होतो. माझ्या मनात असे कधी झाले नव्हते की हे सर्व माझ्या बाबतीत सुद्धा घडेल.

त्यावेळी मला फक्त एवढेच वाटायचे की आमचा चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा. कारण मला माझी वैयक्तिक लाइफ प्रोफेशनल लाईफ मध्ये आलेली आवडत नाही. त्यामुळेच मी धडकन चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत होते.
त्यानंतर अक्षय कुमार एकदा बोलला होता की शिल्पा शेट्टीने त्यांच्या रिलेशनशिप बाबत असा तमाशा करायला नको होता. यावर शिल्पा शेट्टी ने उत्तर दिले की त्याने जे काही माझ्यासोबत केले यावर तो अजून काय बोलू शकतो. असा विचार अक्षयच करू शकतो मी नाही.

तेव्हा शिल्पा शेट्टी हे देखील बोलली की तिला ट्विंकल खन्ना सोबत कोणतीच तक्रार नाही. यात तिची काय चूक जर माझा बॉयफ्रेंड मला धोका देत असेल तर यात फक्त आणि फक्त अक्षय कुमारची चूक आहे. अक्षय कुमारने माझा वापर केला आणि जेव्हा त्याच्या आयुष्यात कोणी नवीन व्यक्ती आली तेव्हा अगदी आरामात मला सोडून दिले. माझा राग फक्त आणि फक्त अक्षय कुमार वर आहे. मी आता या सर्व गोष्टींपासून खूप पुढे आली आहे. परंतु यापुढे कधीच त्याच्यासोबत काम करणार नाही.

त्यावेळी मी जे काही केले याबाबत मला जरा देखील लाज वाटत नाही. कारण मी बाकीच्या अभिनेत्रींना सुचित करू इच्छित होते की त्यांनी अक्षय कुमार पासून लांब राहावे. कोणा एका व्यक्तीला त्याचे खरे रूप जगासमोर आणणे गरजेचे होते. मला अक्षय कुमार ला याची जाणीव करून द्यायचे होते की तो कोणाच्या मनाचा खून करून त्यातून असा पळून जाऊ शकत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *