‘मकडी’ चित्रपटातील ‘मुन्नी’ आता मोठी झाली असून एखाद्या अप्सरे सारखीच दिसते सुंदर !

592

बॉलीवूड मध्ये अभिनेता अभिनेत्रींना महत्वाचे स्थान असले तरीही चित्रपटांमध्ये असलेले बालकलाकार एक वेगळाच भाव खाऊन जातात. त्यांचा सहज आणि निरागस अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालतात. असे अनेक बालकलाकार आहेत जे आता बॉलिवुड मध्ये अभिनेता – अभिनेत्री म्हणून काम करत आहेत. आज आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत ती तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करत आहे. ती बालपणी तिच्या निरागस अभिनयासाठी प्रसिद्ध होती.
या अभिनेत्रीचे नाव आहे श्वेता बसू प्रसाद. श्वेताने मकडी या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. या चित्रपटात तिची दुहेरी भूमिका होती. तिच्या भूमिकांचे नाव चुन्नी मुन्नी असे होते. या चित्रपटातील तिच्या कामासाठी तिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अजूनही काही चित्रपटांत बालकलाकार म्हणून दिसली होती. श्वेताने बंगाली, तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले.

हे वाचा – बजरंगी भाईजान चित्रपटातील आईचे पात्र निभावणारी अभिनेत्री खरी कशी दिसते पहा !

एवढे चित्रपट करून देखील श्वेताच्या करीयर ची गाडी हवी तशी रुळावर आलेली दिसत नाही. असे म्हटले जाते की तिच्याकडे कामे कमी येऊ लागली त्यामुळे तिच्यावर आर्थिक संकट ओढावले. हे संकट दूर करण्यासाठी ती देह व्यापार व्यवसायाकडे वळली. याच कारणामुळे तिला २०१४ मध्ये अटक सुद्धा करण्यात आली होती. या सर्व गोष्टींचा परिणाम तिच्या करीयर वर झाला. श्वेता बसूने बद्रीनाथ की दुल्हनियाँ, मर्द को दर्द नही होता या चित्रपटात काम केले आहे. मात्र सध्या ती तिच्या फोटोंमध्ये चर्चेत आली आहे.

हे वाचा – दुधापेक्षाही जास्त गोऱ्या आहेत टीव्ही मालिकामधील या अभिनेत्री, ब्यूटी फिल्टरची सुद्धा पडत नाही गरज !

श्वेता आता २९ वर्षांची झाली आहे. तिचा जन्म ११ जानेवारी १९९१ ला झाला. श्वेताने सांताक्रूझ येथील पोदार हायस्कूल मधून वाणिज्य शाखेत शिक्षण घेतले आणि त्यानंतर मास मीडिया मध्ये डिग्री मिळवली. ती इंडियन एक्स्प्रेस वृत्त पत्रासाठी कॉलम सुद्धा लिहायची. श्वेता दिसायला खूप सुंदर आणि हॉट आहे. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. लोक सुद्धा तिच्या फोटोवर लाईक अँड कमेंट करत असतात.

हे वाचा – विद्या बालनची बहीण आहे तिच्यापेक्षा सुंदर आणि बोल्ड सीन द्यायला आहे खूप प्रसिद्ध !

हे वाचा – भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना या बॉलिवुड अभिनेत्याला डेट करू इच्छिते ! 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !