अख्या जगाला हसवणाऱ्या अवलिया बद्दल जाणून घ्या, सेलिब्रिटी पण इच्छुक असतात याला भेटायला !

447

हिंदी मधील हास्यसम्राट कपिल शर्मा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. तो व्यासपीठावर येताच आपल्याला हसणे अनावर होते. स्वतःमधील कलेचा उत्तम वापर करत आज कपिल शर्माचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत. “द कपिल शर्मा” या स्वतःचा विनोदी कार्यक्रमामध्ये तो सूत्रसंचालन करतो आणि हा कार्यक्रम लोकांमध्ये प्रसिद्ध देखील आहे. खूप खडतर प्रवासातून आज कपिल शर्मा सर्वांचा चाहता बनला आहे.
हल्लीच कपिल शर्माने आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला. याचं दिवसानिमित्त आपण जाणून घेऊया कपिल शर्मा ने आपल्या करियरची कशी सुरुवात केली होती.
कपिल शर्माचा जन्म २ एप्रिल १९८१ मध्ये पंजाबमधील अमृतसरमध्ये झाला. कपिलने आपल्या करियरची सुरुवात १४ वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ साली “हंस दे हंसा दे” यापासून केली होती. या कार्यक्रमामध्ये देखील कपिलच्या विनोदाने सर्वांना हसवले. या विनोदवीराला आणि त्याचा विनोदाला फार पहिल्यापासूनच पसंद केले जाते. कपिलमध्ये विनोद कला असताना देखील अपेक्षित अशी प्रसिद्धी त्याला मिळाली नाही. पण कपिलने हार मानली नाही.
नंतर ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज’ च्या तिसऱ्या पर्वामध्ये कपिल शर्मा होता. या कार्यक्रमासाठी कपिलने 2 ऑडिशनच्या फेऱ्या पार कराव्या लागल्या. अखेरीस या कार्यक्रमातून कपिलला ओळख मिळण्यास सुरुवात झाली, ज्याची कपिल फार पूर्वीपासूनच वाट पाहत होता. कपिल शर्मा या कार्यक्रमाचा विजेता ठरला. या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळाल्यानंतर कपिलचे यशस्वी होण्याचे मार्ग सोपे बनले. यानंतर कपिल ने अनेक विविध कार्यक्रमांमध्ये काम केले.

हे वाचा – चित्रपटातील चकित करणारी दृश्ये वास्तवात अशी चित्रित केली जातात !आत्ताच्या घडीला कपिल शर्मा स्वतःचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये खूप यशस्वी झाला आहे. कपिल शर्मा चा कार्यक्रम हा टीआरपी रेटिंग मध्ये देखील अव्वल क्रमांकावर असतो. कपिल शर्मा चा वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणायचे झाले तर त्याने २ डिसेंबर २०१८ मध्ये प्रेयसी गिन्नी चतरथ हिच्या सोबत विवाह केला. या दोघांनाही आता एक गोड मुलगी झाली आहे, तिचं नाव अनायरा आहे.

हे वाचा – विद्या बालनची बहीण आहे तिच्यापेक्षा सुंदर आणि बोल्ड सीन द्यायला आहे खूप प्रसिद्ध !

सध्या देशावर आलेल्या कोरोना संकटामुळे मदत म्हणून कपिल शर्माने PM केयर्स फंडमध्ये ५० लाख रुपयांची मदत देऊ केली. इंस्टाग्राम वर त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले की, “ज्यांना आपली खरोखरच गरज आहे त्यांच्यासोबत उभे राहण्याची आता ही वेळ आहे.
कोरोना विषाणू विरुद्ध युद्ध लढण्यासाठी PM केयर्स फंडमध्ये मी पन्नास लाख रुपये दान म्हणून देत आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण घरी राहा आणि सुरक्षित राहा.”

हे वाचा – मेकअपचा तिरस्कार करते हि अभिनेत्री पण दिसायला आहे खूपच सुंदर !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.