Headlines

या ६ अभिनेत्यांनी साकारली प्रभू रामाची भूमिका, पण यांची ठरली सर्वांत प्रसिद्ध !

तारीख पे तारीख! तारीख पे तारीख ! अशी अवस्था ज्या केसची झालेले ती म्हणजे अयोध्येचे राम मंदिर ! अयोध्या येथील वादग्रस्त भूमीवर बाबरी मशीद असावे की राम मंदिर या विषयावर वर्षानुवर्षे खटला चालू होता. मात्र ९ नोव्हेंबर २०१९ ला सुप्रीम कोर्टाने अयोध्याच्या त्या वादाला पूर्णविराम देत त्या वादग्रस्त जागी राम मंदिर बांधले जाईल असा निकाल दिला.
त्यामुळे हिंदू लोकांच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि राम भक्तीस पूर आला. हिंदू धर्मात रामाला खूप महत्त्व प्राप्त आहे. शिवाय टीव्हीवर देखील रामायण संबंधित अनेक मालिका प्रसारित होत असतात. त्या मालिकांमध्ये या सहा अभिनेत्यांनी प्रभु रामाची भूमिका साकारली होती. यातील तुमचा आवडता राम कोणता हे आम्हाला नक्की कळवा.
१) अरुण गोविल –
१९८७ मध्ये रामानंद सागर यांची रामायण ही मालिका दूरदर्शन वर प्रसारित होत असे. या मालिकेत अरुण गोविल यांनी रामाची भूमिका साकारली होती. रामानंद सागर यांची रामायण मालिका पाहिलेल्या प्रेक्षकांना इतर कोणतेच रामायण आवडले नाही. कारण या मालिकेतील सर्व पात्र अगदीच खरे खरे वाटत होते. त्यावेळी लोक अरुण गोविल यांना खऱ्या रामाच्या प्रतिमेत बघत होते.

हे वाचा – रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची संपत्ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल !२) नितीश भारद्वाज –
२००२ मध्ये रामायण मालिका पुन्हा बनवली गेली. या मालिकेत रामाची भूमिका नितेश भारद्वाज यांनी केली होती. शिवाय महाभारत मालिकेत सुद्धा नितीश भारद्वाज यांनी काम केले होते. पण तेथे त्यांची भूमिका थोडी वेगळी होती. महाभारतात नितीश भारद्वाज यांनी भगवान श्रीकृष्ण यांची भूमिका साकारली होती. लोकांना नितीश भारद्वाज यांच्या श्री कृष्ण आणि प्रभुराम या दोन्ही भूमिका आवडल्या होता.
३) गुरमीत चौधरी –
२००८ मध्ये एनडीटीव्ही इमॅजिन वर पुन्हा एकदा रामायण मालिका बनवण्यात आली. ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेत रामायण थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आले. या मालिकेत गुरमीत चौधरी ने रामाची भूमिका साकारली होती त्यानंतर तो टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध व हॉट अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला.
४) गगन मलिक –
२०१५ मध्ये महाबली हनुमान ही मालिका आली होती. या मालिकेतील रामाची भूमिका तेव्हा खूप गाजली. ही रामाची भूमिका गगन मलिक यांनी केली होती. जी लोकांना खूप आवडली.

हे वाचा – रामायण मधील सीता आत्ता काय करते बघा, आणि पहा तिचे आत्ताचे फोटोज !५) आशिष शर्मा –
२०१६ मध्ये रामायण एका वेगळ्याच ढंगात प्रेक्षकांना दाखवण्यात आले. या मालिकेत संपूर्ण रामायण हे सीता मातेच्या दृष्टिकोनातून दाखवण्यात आले होते. त्यावेळी आशिष शर्मा यांनी भगवान रामाची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना खूप आवडली.
६) हिमांशु सोनी –
सध्या कलर्स टीव्ही वर राम सिया के लव कुश ही मालिका प्रसारित होत आहे. यामध्ये रामाची भूमिका हिमांशु सोनी साकारत आहेत. ही मालिका तर प्रेक्षकांना आवडते मात्र तरीही हिमांशु सोनी यांना अरुण गोविल यांच्या तुलनेत खाली दाखवले जाते.
हे वाचा – रामायण सिरीयल मधील शूर्पणखाचे नाक कापते वेळी सेटवर झाला होता हा गमतीदार किस्सा !

हे वाचा – दारासिंह यांना अशा प्रकारे मिळाला हनुमानाचा रोल, मुलगा विंदू सिंह याने सांगितली कहाणी !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *