फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली कोण आहे ओळखलत? आधी कधीच घातले नाही छोटे कपडे, पण आता मात्र पूर्ण … , जाणून घ्या कोण आहे ती !

bollyreport
3 Min Read

सोशल मीडियावर रोज काहीना काही नवीन गोष्टी व्हायरल होत असतात. सर्वसामान्य माणसांपासून ते अगदी मोठमोठ्या सेलिब्रीटिंपर्यंत सगळेच आपली माहिती आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. यामध्येच कोणी सेलिब्रीटिंचा लहानपणीचा फोटो दिसला की त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर हे फोटो शेअर करतात.

दरम्यानच या चिमुकल्या मुलीचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये या मुलीने ट्रेडिशनल कपडे घातले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. हीच लहान मुलगी आज इंडस्ट्रितली एक नावाजलेली अभिनेत्री आहे.

ही चिमुकली नेमकी आहे कोण? अजूनही आपण ओळखलात नाही ही लहान मुलगी नेमकी कोण आहे ते. फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली आणखी कोणी नसून रश्मिका मंदाना आहे. पारंपारिक कपड्यांमध्ये डान्सच्या पोज सोबतच तिच्या गोड हास्यामुळे ती आणखीच सुंदर दिसत आहे.


या फोटोमुळे एक गोष्ट तर पटली ती म्हणजे रश्मिका लहानपणापासूनच इतकी क्यूट आहे. साऊथ इंडस्ट्रिमध्ये तर रश्मिकाला सगळेच ओळखतात पण पुष्पा चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये देखील तिने आपली ओळख निर्माण केली आहे.

साऊथ इंडस्ट्रिमध्ये मिळवले नावलौकिक – रश्मिका मंदानाने ‘डिअर कॉम्रेड’, ‘गिथा गोविंदम’, ‘सीता रामम’ आणि ‘पुष्पा’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम करून लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. २०१६ मध्ये रश्मिकाने आपल्या ऍक्टिंगची सुरुवात ‘किरिक पार्टी’ या चित्रपटापासून केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)


‘किरिक पार्टी’ हा चित्रपट सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटातील भूमिकेसाठी रश्मिकाला पारितोषिक देखील मिळाले होते. २०१७ मध्ये ‘अंजनी पुत्र’ आणि ‘चमक’ या कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा तिने काम केले.

‘चमक’ या चित्रपटासाठी देखील तिला बेस्ट एक्टरेसचा अवॉर्ड मिळाला होता. रश्मिका मंदाना सुरुवातीपासूनच आपल्या कामामध्ये चोख राहिली आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे लोकांना ती आवडते आणि तिचे कौतुक देखील केले जाते.

आता बॉलिवूडमध्ये देखील पडणार आपली छाप – साऊथ इंडियानंतर रश्मिका मंदाना आता बॉलिवूडमध्ये आपली छाप पडणार आहे. ‘गुडबाय’ या येणाऱ्या आगामी चित्रपटात रश्मिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. विकास बहल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ७ ऑक्टोबरपासून सिनेमागृहांमध्ये पाहायला मिळणार आहे.

यासोबतच रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात रोमांस करताना पाहायला मिळणार आहे. रश्मिका मंदानाला हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना पाहण्यासाठी तिचे फॅन्स तिची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.