… म्हणून अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन सोबत केले लग्न, खूप वर्षांनी सांगितलं गुपित !

1895

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ३ जून १९७३ मध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे दोघे विवाहबंधनात अडकले. काल त्यांच्या वाढदिवसाचा ४७ वा वाढदिवस झाला. अशा या दिवशी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर त्यांच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सोबतच त्यांचे लग्न कसे झाले याबद्दल सुद्धा अमिताभ यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.
बिग बींनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करताना लिहिले की, ४७ वर्षे… आज.. ३ जून १९७३ ..!! आम्ही ठरवले होते कि जंजिरा हा चित्रपट यशस्वी झाला तर काही मित्रांसोबत आम्ही पहिल्यांदाच लंडनला फिरण्यासाठी जाऊ. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला विचारले कोणासोबत जात आहेस? जेव्हा मी त्यांना कोणासोबत जात असल्याचे उत्तर दिले त्यावेळी त्यांनी मला सर्वप्रथम तिच्यासोबत लग्न करण्यासाठी सांगितले. जर लग्न करायचे नसल्यास जाऊ नकोस असे खडसावले. यासाठी मी त्यांचं ऐकलं !
जया आणि अमिताभ यांचे लव स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. सिमी ग्रेवाल यांच्या चॅट शोमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या आणि ज्याच्या पहिल्या भेटीबद्दल आणि त्यांच्या लव्ह स्टोरी बद्दल सांगितले होते. बिग बींनी जया यांना पहिल्यांदा एका मॅगझीनच्या कव्हर पेजवर पाहिले होते. त्या मॅगझिनवर जया यांना पाहून अमिताभ खूप इम्प्रेस झाले होते. अमिताभ यांनी सांगितले की त्यांना नेहमीच भावी जोडीदार म्हणून अशी मुलगी हवी होती जी आतून ट्रॅडिशनल आणि बाहेरून मॉर्डन असेल. आणि विशेष म्हणजे जया बिलकुल तशाच होत्या. त्यामुळेच अमिताभ मनातल्या मनात ज्या यांना पसंत करू लागले.
त्यानंतर खूप काळाने ऋषिकेश मुखर्जी गुड्डी या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन अमिताभ यांच्याकडे आले. गुड्डी या चित्रपटानंतर एक नजर या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. या चित्रपटापासून या दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली. त्यानंतर ३ जून १९७३ ला दोघांनी लग्न केले. या लग्नाला अमिताभ आणि जया यांच्या परिवारातील काही सदस्य आणि जवळील मित्रपरिवार सहभागी होता. हे लग्न अगदी साधेपणाने झाले होते.

हे वाचा – फिल्म इंडस्ट्री मधल्या या भावा बहिणींच्या जोड्या, काही ठरले हिट तर काही फ्लॉप !

हे वाचा – बॉलीवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’ वापरतो या ब्रँडचे शूज, किंमत पाहून विश्वास नाही बसणार !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !