Headlines

मला कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते, रेखाने केला धक्कादायक खुलासा, वयाच्या १५व्या वर्षी करावे लागले हे काम !

एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री रेखा ची ओळख करून देण्यासाठी नव्या कोणत्या गोष्टी सांगण्याची गरज भासत नाही. चित्रपटांसोबतच तिचे वैयक्तिक आयुष्य सुद्धा वेगवेगळ्या घटनांनी भरलेले आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये रेखा वरून अनेक विषयांवर चर्चा होत असतात. बॉलिवूड अभिनेत्री रेखाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोबतच अनेक गोष्टींमुळे ती चर्चेत सुद्धा राहिलेली आहे. रेखा बॉलिवूड मध्ये कशी आली आणि तिला अभिनेत्री कोणी बनवले याचा खुलासा स्वतः रेखाने केला. रेखाने सांगितले की तिला कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते. पण नशीबाचा खेळ असा आहे की ती बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बनली.
एका जुन्या मुलाखतीमध्ये रेखाने सांगितले की, जेव्हा मी १३ वर्षांची होती तेव्हा कुलजीत पाल आणि शत्रुजीत पाल एका अभिनेत्रीच्या शोधात मद्रासला आले होते. तेव्हा त्यांना कोणीतरी माझ्याबद्दल सांगितले. माझे आई-वडीलांचे आधीपासूनच साउथ इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव होते. त्यामुळे त्यांना शोधात ते माझ्यापर्यंत पोहोचले. त्यावेळी त्यांनी मला विचारले की तुला अभिनेत्री बनायचे आहे का? मी त्यांना नो असे उत्तर दिले. त्यानंतर त्याने विचारले तुला हिंदी बोलता येते का? या प्रश्नावर सुद्धा मी नो असेच उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी सांगितले आम्ही उद्या येऊन तुला चित्रपटासाठी साइन करून घेऊ.
रेखाने मुलाखतीत सांगितले की आज कालच्या अभिनेता किंवा अभिनेत्रींच्या मुलांना विचारल्यास तुम्ही मोठे होऊन काय बनू इच्छिता तर ते अगदी आनंदाने अभिनेता किंवा अभिनेत्री असेच उत्तर देतात. मात्र मला कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते. माझे आई-वडील सुद्धा कलावंत होते त्यामुळे त्यांचे सुद्धा इच्छा होती की मी अभिनेत्री बनावे. त्यावेळी मला मारून अभिनेत्री बनवले गेले. रेखाने वयाच्या १३ व्या वर्षात चित्रपटात पदार्पण केले होते. तर अवघ्या १५ व्या वर्षी तिला चित्रपटामध्ये किसिंग सीन द्यावा लागला होता.
अनजाना या चित्रपटात रेखाला पूर्वकल्पना न देताच या चित्रपटात किसिंग सीन टाकले होते. या किसिंग सीन चे चित्रीकरण पाच मिनीटे चालु होते. या किसिंग सीन नंतर रेखा खूप वेळ रडत होती. आता मात्र रेखा बॉलीवूड इंडस्ट्रीची एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या ती चित्रपटांमध्ये जरी कमी दिसत असली तरीही ती खूप ऍक्टिव्ह आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *