Headlines

या कारणामुळे कटरीना कैफ ने तिचे आडनाव बदलले, खरे आडनाव ऐकून हसाल !

सिनेजगतात असे अनेक कलाकार आहेत ते त्यांच्या खऱ्या नावाने ओळखले जात नाही. यातील काही कलाकारांचे एखादे पात्र इतके गाजते की पुढे जाऊन त्या कलाकाराला त्याच नावाने ओळखले जाते. तर काही कलाकार स्वतःहून आपले नाव बदलतात. अशा या कलाकारांमध्ये बॉलीवुडची घायाळ करणारी सौंदर्यवती कटरिना कैफ चे नाव सुद्धा सहभागी आहे.
कटरीना कैफ चे खरे नाव कटरीना टरकोटे आहे. तिचे स्वतःचे नाव बदलण्या मागचे कारण सुद्धा खूप गमतीशीर आहे.
खरेतर टरकोटे हे आडनाव तिच्या आईचे आहे. मात्र कॅटरिना तिच्या नावापुढे वडिलांच्या आडनावाचा उपयोग करते. कॅटरिना कैफ च्या वडिलांचे नाव मोहम्मद कैफ असे आहे. यामुळेच ती तिच्या नावापुढे कैफ हे आडनाव लावते. कटरीना ने अनेक मुलाखतीमधून तिच्या आडनावा बद्दल खुलासा केला आहे.
तिच्या नावावरून बोलताना कटरीना ने सांगितले होते की तिच्या पासपोर्टवर तिचे नाव कटरीना टरकोटे आहे. तिने तिचे नाव बदलले कारण तिचं नाव घेण्यात लोकांना अडचण येऊ नये. शिवाय तिच्या भारतीय फॅन्सना टरकोटे हे नाव बोलण्यात थोडी अडचण येऊ शकते. याच मुळे कटरीना टरकोटेला आज सारे जग कटरिना कैफ म्हणून ओळखते.
कटरिना कैफच्या बॉलीवूड करिअर बद्दल बोलायचे झाल्यास तिने तिच्या करिअरची सुरुवात २००३ मध्ये केली होती. २००३ मध्ये आलेल्या बुम या चित्रपटात कटरीना दिसली होती. तिचा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र नंतर सलमान खान सोबत काम करून तिला खूप यश मिळाले. कटरीना २००५ मध्ये सलमान खान आणि सुष्मिता सेन सोबत ‘मैने प्यार क्यू किया’ या चित्रपटात दिसली होती. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली. त्यानंतर कटरिनाने बॉलिवूडमध्ये अनेक शानदार चित्रपटांमध्ये काम केले.
लवकर ती सूर्यवंशी या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असेल. रोहित शेट्टींनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. खरेतर सूर्यवंशी हा चित्रपट मार्च महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता परंतु कोरोनाव्हायरस मुळे संपूर्ण देश टाळेबंद करण्यात आला. त्यामुळेच सध्या सर्व सिनेमेगृहां सोबतच बॉलीवूड इंडस्ट्री सुद्धा बंद आहे. यामुळे सूर्यवंशी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *