Headlines

जाणून घ्या तुमचे आवडते कलाकार लॉकडाउनच्या काळात काय करतात !

सध्या कोरोनाच्या संक्रमणामुळे संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉक डाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला. या लॉक डाऊन मुळे सगळ्याच क्षेत्रात स्थगिती निर्माण झाली आहे. क्षेत्रातील कामे थांबवून तेथे काम करणाऱ्या माणसांना घरी राहण्याचे आवाहन मोदी यांनी केले. यामध्ये सिनेइंडस्ट्रीत मधले कलाकार सुद्धा आहेत. त्यामुळे या फावल्या वेळेत तुमचे आवडते कलाकार काय करतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अक्षय कुमार –
बॉलिवूडचा खिलाडी हा नेहमीच त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असतो. त्याला फार कमी वेळ त्याच्या कुटुंबाला द्यायला मिळतो. पण सध्या लॉक डाऊनच्या कारणाने सर्व शूटिंग थांबल्यामुळे अक्षय कुमार सध्या घरी वेळ घालवत आहे.

सध्या सोशल मीडियावर खिलाडी अक्षय कुमारचा एक फोटो व्हायरल होत आहे जातो त्याची पत्नी ट्विंकल खन्ना सोबत निवांत गप्पा मारत बसला आहे. अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट २४ मार्चला प्रदर्शित होणार होता मात्र कोरोनाव्हायरस संक्रमणामुळे या चित्रपटाचे प्रदर्शनाची तारीख ही स्थगित करण्यात आली. शिवाय पुढील येणारा चित्रपटांचे शूटिंग सुद्धा थांबवण्यात आले.

अक्षय कुमारचे बरेच चित्रपट हे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत जसे की पृथ्वीराज, लक्ष्मी बॉम्ब, बेलबॉटम आणि बच्चम पांडे. संपूर्ण वर्षात चार चित्रपट करणाऱ्या अक्षयकुमार कडे कुटुंबासाठी फारसा वेळ नसतो. मात्र आता आयत्या भेटलेल्या वेळेमुळे तो कुटुंबासोबत छान वेळ घालवीत आहे.

करीना कपूर –
कोरोनाव्हायरस मुळे बॉलीवूड चे संपूर्ण काम थांबले असताना करीना कपूरचा लाल सिंह चढ्ढा या चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे. करीनाने नुकतेच सोशल मीडियावर पदार्पण केले. यामध्ये तिने स्वतःचे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट ओपन केले आहे.

त्यामुळे या क्वारंटाईम च्या दिवसात ती सोशल मीडियावर बिझी असते. तर सैफ अली खान पुस्तके वाचून स्वतःचा टाईम घालवत आहे. इंस्टाग्राम वर करीनाने काही फोटो सुद्धा शेअर केल्या आहेत व त्याला मजेदार असे कॅप्शन सुद्धा दिले आहेत. करिनाने सैफ पुस्तक वाचनाचा एक फोटो पोस्ट केला आणि त्या खाली लिहिले की ” ऐसा लग रहा है जैसे वह इस हफ्ते के लिए ‘बुक’ है और मै इंस्टाग्राम के लिए.”
करीना कपूरच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांना सोबतच काही सेलिब्रिटींनी सुद्धा खूप कमेंट केल्या आहेत. करीनाने अजून एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये गाजराचा हलवा खाताना दिसते.
करिष्मा कपूर –
या लॉक डाउन मध्ये करीनाची मोठी बहीण करिष्मा कपूर सुद्धा घरातच आहे. करिश्माने तिच्या चाहत्यांना या कठीण समयी सुरक्षित आणि सकारात्मक राहण्याचे अपील केले आहे.

दीपिका पादुकोण –
दीपिका पादुकोण सुद्धा या कोरोनाच्या भितीमुळे भीतीमुळे घरात बंद आहे. मात्र मिळालेल्या वेळेचा सदुपयोग म्हणून ती घरातील कपाट व्यवस्थित लावत आहे तसेच नवऱ्यासोबत म्हणजेच रणवीर कपूर सोबत मजेत वेळ घालवत आहे, त्याकाळात पियानो सुद्धा शिकत आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ शिकून ते फोटो इंस्टाग्राम वर शेअर करीत आहे.
लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *