बॉलीवूड इंडस्ट्रीचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या प्रत्येक चित्रपटांमधून त्याच्या चाहत्यांना त्याच्या प्रेमात पडायला भाग पडतो. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अक्षय कुमारची जादूच अशी आहे त्यामुळे कोणीही त्याचा सहज चाहाता बनू शकतो.
एवढेच नव्हे तर अक्षय कुमार कॉमेडी असो ॲक्शन असो किंवा कोणत्याही सामाजिक बांधिलकीशी संबंधित चित्रपटात सहज अभिनय करतो. कदाचित दिवसेंदिवस त्याच्या चाहते वर्गात वाढ होण्याचे हेच कारण असू शकते. आज आम्ही तुम्हाला अक्षय कुमारला कोणत्या ब्रँड चे शूज घालायला आवडतात हे सांगणार आहोत.
त्याच्या शूज बद्दल बोलायचे झाल्यास तो अधिकतर एकाच ब्रँडच्या शुजचा वापर करणे पसंत करतो. मग तो कोणताही चित्रपट असो किंवा त्याचे वैयक्तिक आयुष्य असो तो त्याच ब्रँडचे शूज घालतो. अक्षय कुमार २०११ पासून Onitsuka Tiger या ब्रँडचे शूज घालतो.
देसी बॉयज या चित्रपटामध्ये सर्वप्रथम त्याच्या शुजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आलेल्या गब्बर इज बॅक, हाऊसफुल २ आणि अनेक चित्रपटात त्याने त्याच ब्रँड च्या शूजचा वापर केला आहे. यामध्ये त्याच्या शुजचा रंग फक्त बदलतो पण ब्रँड मात्र तोच असतो.
जर तुम्ही अक्षयला मुंबई एयरपोर्ट किंवा कोणत्याही चित्रपटाचे प्रमोशन करते वेळी पाहिले असेल तर तो याच ब्रँडच्या शूज मध्ये दिसेल. या ब्रँड बद्दल बोलायचे झाल्यास हा ब्रँड जपान मधील एका कंपनीचा आहे. ही कंपनी १९४९ मध्ये स्थापन झाली होती.
या कंपनीला ३२ वर्षांच्या Kihachiro Onitsuka या मिलेट्री ऑफिसर ने सुरू केले होते. या ब्रँडचे शूज खूप आरामदायक असतात त्यामुळेच अक्षय कुमार या ब्रँडचे शूज जास्त वापरतो. एवढेच नव्हे तर या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर ने सुद्धा खुलासा केला आहे की अक्षय कुमार त्यांच्या कंपनीच्या शूज चा किती मोठा चाहता आहे.
अक्षय कुमार ज्या ब्रँडचे शूज घालतो त्यांची किंमत ही २००० पासून ते ८००० रुपये इतकीच आहे. या ब्रँडचे शूज हे फक्त स्टार्स किंवा खेळाडू मध्येच नव्हे तर सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत.
लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
बॉलीवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’ वापरतो या ब्रँडचे शूज, किंमत पाहून विश्वास नाही बसणार !
![](https://bollyreport.com/wp-content/uploads/2020/04/akshay-cover.jpg)