पहा तुमच्या आवडत्या अभिनेत्रींचे शिक्षण किती झाले आहे, वाचून विश्वास बसणार नाही !

3134

बॉलिवूड कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास प्रत्येक प्रेक्षक हा उत्सुक असतो. एखादा कलाकार याबद्दलच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांचे चाहते जाणून घेण्यास उत्सुक असतील तर या गोष्टीवरून त्या कलाकाराची पॉप्युलॅरीटी लक्षात घेतली जाऊ शकते.
आता तुमच्या मनात या प्रसिद्ध अभिनेत्री किती शिकल्या असते हा प्रश्न नक्कीच येत असेल. तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या अभिनेत्री कितवी पर्यंत शिकल्या आहेत याची माहिती देणार आहोत.
१) आलिया भट – 
राजी, गली बॉय यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम करणारी अभिनेत्री आलिया भट्ट ही जास्त शिकलेली नाही. आलियाने २०१२ मध्ये स्टूडेंट ऑफ द इयर या चित्रपटातून पदार्पण केले होते. आलियाने तिच्या शाळे नंतर लगेचच तिच्या फिल्मी करीयरला सुरूवात केली होती. मात्र पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर तिला एका पाठोपाठ चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या त्यामुळे तिला १२ वी नंतर शिक्षण थांबवावे लागले.
२) कंगना राणावत –
बॉलिवुड मध्ये स्वतः च्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट हिट करणारी अभिनेत्री कंगना राणावत १२ वी ला नापास झाली होती. त्यानंतर तिने पुढील शिक्षण घेणेच टाळले. मॉडेलिंग साठी ती दिल्ली व नंतर मुंबईमध्ये आली. करीयरच्या सुरुवातीला तिचे इंग्रजी तितके खास नव्हते त्यामुळे तिची खूप खिल्ली उडविली जायची असे तिने स्वतः सांगितले.
३) करिष्मा कपूर –
१९९१ मध्ये आलेल्या प्रेम कैदी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री करिश्मा कपूर ही केवळ ५ वी इयत्तेपर्यंतच शिकली आहे. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल ना पण हे खरे आहे. करिष्मा कपूर कडे डिग्री तर दूरची गोष्ट पण माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्याचे सर्टिफिकेट सुद्धा नाही. करिष्मा कपूर ची गिनती सर्वात कमी शिकलेल्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. एवढे जरी असले तरी तिने इंडस्ट्री मध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
४) काजोल –
सेंट जोसेफ मध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर काजोल ला बेखुदी या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिने तिचे संपूर्ण लक्ष फक्त चित्रपटांकडे वळवले. आज ती बॉलिवुड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज तिला फक्त १० वी शिकल्याबद्दल कमीपणा घेण्याची गरज सुद्धा नाही कारण तिने तिच्या अभिनया द्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
५) कतरिना कैफ –
स्वतः च्या नृत्य कौशल्या द्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री कतरिना कैफ हिला आता लहान मुले देखील ओळखतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का कतरीना आणि अभ्यासाचा दूर पर्यंत संबंध नाही. मात्र कतरीना ने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलिंग विश्वात प्रवेश घेतला होता. कतरीना ने तिच्या कामाच्या आवडी पुढे अभ्यासाचा त्याग केला !
लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.