Headlines

सलमान खान सर्वात महागडे अन्नपदार्थ खाणारा अभिनेता, दिवसाला करतो एवढा खर्च !

हिंदी चित्रपटसृष्टीतील बजरंगी भाईजान ५४ वर्षाचा असून देखील अगदी तंदुरुस्त दिसतो. अनेक हिट ठरलेल्या चित्रपटांमध्ये सलमानने काम केले आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये अगदी नव्या अंदाजाने आणि जोमाने त्यांना काम करताना आपण पाहतो. फार कमी लोक असतात जे पन्नाशी पार करून ही इतके जवान आणि तंदुरुस्त दिसतात. सर्वांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की सलमान इतका तंदुरुस्त आणि जवान कसा काय दिसतो? तर आज आपण पाहूया की सलमान असं काय अन्न खातो वा असे काय डाईट पाळतो जेणेकरून ते इतके तंदुरुस्त दिसतात. सोबतच किती महागडे अन्नपदार्थ ते खातात आणि त्यावर रोजचा किती खर्च होतो.
१९८८ मध्ये सलमानने हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत चित्रपटसृष्टीत त्यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे. त्यांच्या चित्रपटांची एक वेगळीच चर्चा असते. त्यांनी वेगवेगळे जॉनर असलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि अजून ही ते विविध चित्रपटांमध्ये मुख्य कलाकार म्हणून अभिनय करतात. आज ही ते चित्रपटांमधून २०० ते ३०० करोड इतकी कमाई करतात. सलमानला विविध चविष्ट पदार्थ खाणे आणि भटकंती करणे खूप आवडते.
सलमान सकाळी उठून व्यायामासाठी व्यायामशाळेत जाऊन आल्यावर नाश्त्यामध्ये ४ अंडी खातात. सलमानला दक्षिण भारतामध्ये बनवले जाणारे पदार्थ फार आवडतात. सलमान खान आठवड्यातले ४ दिवस दुपारच्या जेवणासाठी फलाहार घेतात व बाकीचे दिवस दक्षिण भारताकडील पदार्थ खाणं पसंद करतात.
रात्रीच्या जेवणामध्ये सलमानला चिकन खातात. वेगवेगळ्या पदार्थांसह त्यांना कोशिंबीर खायला देखील आवडते. सलमानचा चक्क खाण्यासाठी ८ हजार ते १० हजार इतका एका दिवसाचा खर्च आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *