Headlines

जीव झाला येडापिसामध्ये सिध्दी शिवाला देणार खास सरप्राईझ !

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सिध्दी आणि शिवाचं प्रेम दिवसागणिक फुलत आहे. या दोघांमधले प्रेमळ क्षण पाहण्याची आतुरता प्रेक्षकांना होती आणि ते आता मालिकेमध्ये बघायला मिळत आहे. शिवा आणि सिद्धीच्या नात्यात आता प्रेमाचा ओलावा येऊ लागला आहे. गैरसमज आणि वाद विसरून एकमेकांचा हात घट्ट धरून त्यांनी सुखी संसाराची वाटचाल सुरू केली आहे. यामध्ये एकमेकांना खुश ठेवण्याचा ते खूप प्रयत्न देखील करत आहेत.
शिवा सिध्दीला खुश ठेवण्यसाठी एकामागून एक सरप्राईझ देत आहेत. मग
, सिध्दी कशी मागे राहील. लवकरच सिद्धी शिवाला एक सरप्राईझ देणार आहे. मालिकेमध्ये सिद्धीचा मेकओव्हर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. शिवाने सिध्दीसाठी खास खरेदी केली आहे. शिवा सिध्दीच्या या फुलत जाणार्‍या प्रेमाला मंगलची नजर तर लागणार नाही ना? सिद्धी आणि शिवा मध्ये फुट पाडण्याचा, त्यांना वेगळ करण्याची मंगल कुठलीच संधी सोडत नाही. आता देखील कुठेतरी शिवा सिद्धीवर नाराज आहे कारण, शिवाने खास तिच्यासाठी आणलेले कपडे घालण्यास नकार दिला आहे. मंगल नाराज असलयाने अशा परिस्थितीत हे सगळे करणे सिध्दीला चुकीचे वाटलत आहे. आणि हे समजविण्याचा सिद्धीने प्रयत्न देखील केला, पण दोघांमध्ये वाद झाला तो झालाच.
आता बघूया सिद्धी शिवाला कसे सरप्राइझ देणार? सिध्दीचा नवा लुक बघून शिवाची काय प्रतिक्रिया असेल? पण, सिद्धी नव्या लुकमध्ये खूप सुंदर दिसते आहे हे मात्र नक्की. तेंव्हा बघा जीव झाला येडापिसा सोम ते शनि रात्री ८.०० वा. असलया कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *