ऋतिक व सुझानने पुन्हा एकत्र राहण्यास सुरुवात केली, जाणून घ्या या मागील कारण !

413

सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरस चे सावट असताना प्रत्येक देश लॉक डाऊन केले गेले आहेत. या लॉक डाऊन मुळे सर्व सामान्य लोकांना पासून ते हॉलिवुड आणि बॉलिवुड मधील कलाकार सुद्धा घरात कैद झाले आहेत. आता या लॉक डाऊन च्या काळात अशी खबर आली आहे की बॉलिवुड अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी त्यांच्या मुलांसाठी पुन्हा एकत्र आले आहेत. परंतु हे एकत्र येणे केवळ काही दिवसांसाठी असेल.
लॉक डाऊन च्या काळात आपली मुल त्यांच्या आई किंवा वडील या दोघांपैकी एकापासून ही दूर राहू नयेत यासाठी या दोघांनी हा पर्याय अवलंबला आहे. यासाठीच सुझान हृतिकच्या घरी राहण्यास आली आहे. त्यांच्या या निर्णयावर ऋतिक रोशन चे वडील राकेश रोशन यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

https://www.instagram.com/p/B-UD8UBHCzP/

राकेश रोशन म्हणाले की, जगावर आलेल्या या संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे आणि एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. सुझेन घरी आल्याची वार्ता खुद्द हृतिकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर त्याच्या चाहत्यांना दिली. सोशल मीडिया वरील पोस्ट मार्फत ऋतिकने त्याच्या एक्स वाइफचे सुझेनचे कौतुक केले आहे.

https://www.instagram.com/p/B-ZpZmIHt5E/

 

या कौतुका सोबत त्याने सुझेनचा एक फोटो देखील शेअर केला आहे. या पोस्टमध्ये हृतिकने लिहिले आहे की आमच्या मुलांसाठी सुझेन काही काळासाठी घरी परत आली आहे. या अनिश्चित काळासाठी झालेल्या लॉक डाऊन मुळे आमची मुले त्यांच्या आई-वडिलांपासून दूर राहू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. ऋतिक म्हणतो की अशा या संकटाच्या काळात मुलांनी त्यांच्या आई-वडिलांपैकी एकापासून सुद्धा दूर राहणे म्हणजे एक अकल्पनीय गोष्ट आहे.

 

ज्या क्षणी देश लॉक डाऊन करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी सुझेन तिच्या घरून माझ्या घरी राहण्यास आली. कारण या अनिश्चित काळात आमच्या मुलांना आम्हा दोघांमधल्या कोणा एका पासून दूर राहत असल्याने आमची गरज भासू नये.
ऋतिक आणि सुझेनचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला होता.
मात्र या दोघांनी घटस्फोट घेतल्यानंतर सुद्धा एकमेकांसोबतची बॉण्डिंग खूप चांगल्या प्रकारे ठेवली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघेही त्यांच्या मुलांसाठी कायम एकमेकांच्या संपर्कात राहत असतात. ऋतिक ने सांगितले की आमचा घटस्फोट झाला असला तरीही आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत आम्ही खूप गप्पा मारतो परंतु आम्ही आमच्या मुलांसाठी एकमेकांशी कमिटेड आहोत.
आम्ही दोघं एकमेकांना खूप रिस्पेक्ट देतो. जेव्हा आपल्या मुलांचा प्रश्न येतो त्यावेळी आपल्यातील मतभेद दूर ठेवणे नेहमी योग्य असते.