डीडी चॅनलवर पुन्हा एकदा सुरु झालेल्या कार्यक्रमांवर सनी लियोनी दिली ही बोल्ड रिअ‍ॅक्शन !

664

बॉलिवूडमधील हॉट अँड बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सनी लियोनी ही नेहमीच तिच्या लूकसाठी चर्चेत असते. सनी लियोनी चा जन्म कॅनडामध्ये झाला होता पण तरीही त्याची लोकप्रियता भारतामध्ये खूप आहे. सनी लियोनी नकतेच तिच्या चाहत्यांसाठी काही फोटो शेअर केले आहेत जे खूप सध्या व्हायरल होत आहेत.
सनी लियोनी तिचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत.‌ तिने चे फोटो शेअर केल्या आहेत त्यामधील तिच्या टी-शर्टवर ९० – के दौर मे वापस असे लिहिले आहे. या प्रिंट मागे देखील एक मॅसेज आहे.या टी शर्ट वरती असा लिहलं आहे कि, Bring Back the 90’s म्हणजेच ९०व्या शतकातील गोष्टी परत आणा. त्यामुळे माझे मेसेज खूप सिरीयस घेतले जातात, असं तिचं म्हणणं आहे.
याआधीही सनी लियोनी ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती बॉक्सिंग ग्लव्हज् घालून रागात बॉक्सिंग बॅग कडे बघत होती. या फोटोसोबत सनीने कॅप्शन लिहीले होते की, मी आता लढाईसाठी तयार आहे. पण यावेळी प्रतिस्पर्धी हा अदृश्य स्वरूपात आहे. ‘टच मी नॉट’. या कॅप्शन सोबतच सनीने #FightAgainstCoronaVirus या हॅशटॅगचा वापर केला आहे.
तिचा हा कोरोना व्हायरस लढण्याचा नव्या पर्याय तिच्या चाहत्यांना खूपच आवडला. यावेळी सनीने फोटो शेअर करताना लिहिले की त्यांनी माझे टी-शर्ट खूप गांभीर्याने घेतले. तुम्हाला माहित आहे का डीडी चॅनलवर पुन्हा काय परत आले ?
कोरोनाच्या जगभरात होत असलेल्या संक्रमणामुळे सर्वत्र लॉक डाऊन ची घोषणा केली गेली. त्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शन वरील काही प्रसिद्ध अशा जुन्या मालिकांचे पुनःप्रसारण करण्यास सुरुवात झाली.
त्यातच आता बच्चेकंपनीसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे नव्वदच्या दशकात सुपरहिट ठरलेली मालिका शक्तिमान पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मालिका एप्रिल महिन्यात दुपारी एक वाजता प्रसारित केली जाईल. नव्वदच्या दशकात शक्तिमान ही मालिका इतकी लोकप्रिय होती की प्रेक्षकांच्या मनावर तिची छाप अजून कायम आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉक डाऊन जाहीर केले. यावेळी मोदी यांनी सर्व देशवासियांना घरातच राहण्याचे व कुठेही बाहेर न फिरण्याचे अपील केले. घरात राहून लोक काय करणार. तसेच त्याच त्याच एकाच पठडीतल्या मालिका बघून सुद्धा लोकांना कंटाळा येणार या सर्व गोष्टींचा विचार करून तसेच प्रेक्षकांच्या मागणीचा विचार करून रामायण आणि महाभारत या त्यावेळच्या गाजलेल्या मालिका पुन्हा प्रक्षेपित केल्या जात आहेत.
याशिवाय आता ९० च्या दशकातील सर्कस आणि शक्तिमान यांसारख्या मालिकासुद्धा पुन्हा सुरू होत असल्याने प्रेक्षक खूप खुश आहेत.