सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता इरफान खान चे मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये बुधवारी निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या अचानक झालेल्या दुःखद निधनामुळे सर्वत्र शांततेचे वातावरण पसरले आहे. लॉक डाऊन सारख्या अडचणीत अचानक आलेल्या या बातमीमुळे इरफान खानच्या चाहात्यांसोबतच सर्व सेलिब्रिटीज मध्ये सुद्धा शोककळा पसरली आहे.
आज आम्ही तुम्हाला इरफान खान च्या परिवारात कोण आहे हे सांगणार आहोत सोबतच इरफान खानने शेवटच्या मुलाखतीमध्ये काय सांगितले होते याबद्दल थोडी माहिती देणार आहोत. इरफान खानची पत्नी ही डायलॉग रायटर आहे. तिने दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून शिक्षण पूर्ण केले.
इरफान खान ला बाबिल खान आणि अयान खान अशी दोन मुले आहेत. इरफान खानने मार्च महिन्यात मुंबई मिररला त्यांची शेवटची मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की ते त्यांच्या परिवारावर खूप प्रेम करतात. जेव्हा त्यांना कॅन्सर झाला आहे असे समजले त्यावेळी त्यांना त्यांच्या पत्नी साठी जगण्याची इच्छा आहे असे ते बोलले. त्यावेळी इरफान खान ने दिलेली मुलाखत जर तुम्ही वाचाल तर तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल.
या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मुलांप्रतीची चिंता व्यक्त केली होती. कॅन्सर सारख्या आजाराशी लढताना त्यांनी त्यांच्या मुलांसोबत कसा वेळ घालवला आणि त्यांना मोठे होताना बघितले हेदेखील त्यांनी या मुलाखतीत सांगितले. इरफान खान च्या परिवाराबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्या आईचा काही दिवसांपूर्वीच देहांत झाला होता. तर त्यांच्या पत्नीचे नाव स्वतः सिकंदर आहे आणि त्यांना दोन मुलगे आहेत.
मुंबई मिरर ला मार्चमध्ये दिला गेलेला इंटरव्यू हा इरफान खान यांचा शेवटचा इंटरव्यू होता असे म्हटले जाते. त्यामध्ये त्याने कॅन्सरशी लढा दिला याबद्दल सांगितले तसेच कॅन्सरशी लढण्याची इच्छा ही फक्त आणि फक्त त्यांच्या पत्नी आणि मुलांमुळे निर्माण झाली होती कारण ते अजून त्यांच्यासोबत जगू इच्छित होते. इरफान खान यांनी सांगितले की कॅन्सरशी झुंज असतानाचा काळ हा त्यांच्यासाठी एक रोलर कॉस्टर राईड सारखा होता. या काळात ते खूप रडले सुद्धा आणि हसले सुद्धा! भयंकर बेचैनीसोबत ते काळ घालवत होते.
कॅन्सरसारख्या आजाराचा इलाज करण्यासाठी इरफान खान लंडन ला गेले होते. याच दरम्यान त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवला. मुलाखतीत त्यांनी सांगितले की लंडनला असताना त्यांनी मुलांचे टीएनज बघितले आणि ते क्षण सुखाने जगून घेतले. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत इरफान खानने सांगितले की मी माझ्या पत्नी बद्दल जेवढे बोलेल तेवढे कमीच.
ती माझ्या जीवनाचा अत्यंत कठीण काळात २४ तास ७ ही दिवस कायम माझ्यासोबत असायची. माझ्या कॅन्सर सोबतच्या लढाईत माझ्या पत्नीचे योगदान हे खूप मौल्यवान आहे.
इरफान खान यांना २०१८ मध्ये हाय ग्रेड न्यूरोएंडक्राइन कॅन्सर झाला होता. त्यानंतर ते इलाजासाठी लंडन येथे गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कॅन्सर सारख्या भयानक आजाराला इरफान खान यांनी मात दिली होती परंतु कॉलेन इन्फेक्शनच्या इलाजा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Bollywood Updates On Just One Click