Headlines

रामायण मालिकेत जामवंत ही भूमिका साकारणारे अभिनेता या गोष्टीमुळे पुन्हा आले चर्चेत !

रामानंद सागर यांची रामायण ही मालिका पुन्हा सुरू झाल्यापासून त्यातील कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या प्रत्येक पेक्षा या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे. या मालिकेतील राम-लक्ष्मण-सीता च नव्हे तर सर्वच भूमिका हिट ठरल्या होत्या. त्यातील अजून एक पात्र आहे ज्याचा आवाज आजही लोकांच्या लक्षात आहे त्या पात्राचे नाव आहे जामवंत.
जामवंत हे पात्र राजशेखर उपाध्याय यांनी साकारले होते. यांच्या बुलंद आवाजाने जामवंत पात्र हे अगदी खरेखुरे करून टाकले होते. राजशेखर यांना अभिनय त्यांच्या बालपणापासूनच आवडायचा. ते लहानपणापासूनच अभिनय करत आले आहेत शिवाय बालपणी रामलीला चा हिस्सा सुद्धा होते. असे म्हटले जाते की जेव्हा राजशेखर बनारस मध्ये शिकायचे त्यावेळी रामनगर येथे प्रसिद्ध असलेल्या रामलीला’मध्ये अभिनय करायचे. त्याचवेळी रामानंद सागर यांनी राजशेखर यांना पहिल्यांदा बघितले.
त्यानंतर त्यांनी राजशेखर यांना जामवंत चा रोल ऑफर केला. रामायणात राजशेखर यांनी श्रीधर ची सुद्धा भूमिका साकारली आहे. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती जामवंत ह्या भूमिकेने. त्यांची प्रसिद्धी एवढी होती ही त्यांना एकदा पाहण्यासाठी लोक खूप गर्दी करायचे.
राजशेखर यांनी रामानंद सागर यांच्या विक्रम आणि वेताळ या मालिकेत काम केले आहे. राजशेखर मुंबईत नालासोपारा येथे राहतात. लॉक डाऊनच्या आधी ते युपी मधील भदोही ही येथे गेले होते. आता सुद्धा ते तेथेच आहे. लॉक डाऊन च्या काळात पौराणिक मालिका पुन्हा सुरू केल्यामुळे त्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या सतत वेगवेगळ्या आठवणी जागा होत असून ते त्यावर रिएक्शन देत आहेत.
रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी रामायण ही मालिका पुन्हा सुरू झाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी एका व्हिडिओ मेसेज मध्ये सांगितले की ही खरी तर एक भाग्याची गोष्ट आहे जे दूरदर्शन वर ३३ वर्षांनी रामायण मालिका पुन्हा सुरू झाली. सध्या कोरोना व्हायरस मुळे आपला देश संकटातून जात आहे अशा काळात रामायण ही मालिका दर्शकांना दाखवल्यामुळे त्यांना जर योग्य वागण्याची दिशा मिळत असल्यास प्रेक्षकांनी घरी बसून रामायण ही मालिका पहावी. तसेच मर्यादापुरुषोत्तम चे गुण ग्रहण करावेत ते स्वतःच्या आयुष्याशी जोडावेत आणि आपल्या मुलांना सुद्धा शिकवावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *