Headlines

या आहेत साऊथ कडील श्रीमंत आणि प्रसिद्ध अभिनेत्री, वाचून थक्क व्हाल !

आज आम्ही तुम्हाला साऊथ कडील चित्रपटांच्या श्रीमंत अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. या अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये काम करून भरपूर पैसा कमावला आहे. या अभिनेत्री तुमच्या चांगल्याच परिचयाच्या असतील. यांनी अगदी हिंदी चित्रपटमध्येही काम केलेली आहेत.
१) असीन –
असिन चे नाव साऊथ कडील चित्रपटांमध्ये सर्वात सुंदर आणि सर्वांना आवडणारे अभिनेत्रींमध्ये सहभागी आहे. असिनने तिच्या करिअरमध्ये साउथ कडील चित्रपटां व्यतिरिक्त बॉलीवूडमध्ये सुद्धा काम केले आहे. बॉलिवुडच्या प्रेक्षकांना सुद्धा तिचा अभिनय आवडल्याची पावती तिला वेळोवेळी मिळाली आहे. बॉलिवूडमध्ये अमिर खान सोबत गजनी या चित्रपटामध्ये ती दिसली होती तर सलमान खान सोबत रेडी या चित्रपटामधून असीनने तिच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली होती. तुम्हाला वाचून हैराण व्हायला होईल पण असिनकडे ५०७० करोडो रुपयांची संपत्ती आहे. एवढी संपत्ती तिने चित्रपट आणि बिझनेस मध्ये काम करून मिळवली आहे.
२) अनुष्का शेट्टी –
चित्रपटामध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण करणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी सर्वांनाच माहीत आहे. अनुष्काने साउथ कडील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र मुख्यत्वे तिला बाहुबली आणि बाहुबली २ या चित्रपटांसाठी जास्त ओळखले जाते. अनुष्का कडे सध्या २२ मिलीयन डॉलरच्या आसपास म्हणजेच १७५ कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.
३) तमन्ना भाटिया –
साउथ कडील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून तमन्ना भाटियाला ओळखले जाते. यामुळेच तिचे चित्रपट साउथ सोबतच बॉलीवूड मध्ये सुद्धा खूप हिट होतात. तमन्नाकडे १५ मिलियन डॉलर म्हणजेच १५० करोड रुपये इतकी संपत्ती आहे. तमन्ना चित्रपट आणि जाहिराती मार्फत पैसे कमवते.
४) समंथा –
चित्रपटात चुलबुल्या आणि सुदंर लूक्स मुळे ओळखली जाणारी अभिनेत्री समंथा ने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. साऊथ कडे समंथा ची लोकप्रियता इतकी आहे की तेथील अनेक दिग्दर्शक तिला चित्रपटात कास्ट करू इच्छितात. समंथा कडे ११ मिलियन डॉलर म्हणजेच ८५ करोड रुपये इतकी संपत्ती आहे.
५) काजल अग्रवाल –
या यादीत साऊथ कडील अजुन एक प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल चे नाव सुद्धा सहभागी आहे. काजल ने साऊथ सोबतच बॉलिवुड मध्ये सुद्धा हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे दिग्दर्शकांकडून तिला चित्रपटांसाठी ऑफर येत असतात. काजल कडे १० मिलियन डॉलर म्हणजेच ७४ करोड रुपयांची संपत्ती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *