Headlines

या भारतीय क्रिकेटरचे करियर झाले फ्लॉप पण नशिबाने झाले राजकुमारी सोबत लग्न !

भारतीय क्रिकेट टीम मधील असे अनेक खेळाडू आहेत जे त्यांच्या शानदार खेळीमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र काही क्रिकेटर असे ही आहेत जे त्यांच्या चुकीच्या कामामुळे क्रिकेट करीयर पासून दूर झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे अशा एका क्रिकेटर ची माहिती देणार आहोत ज्याचे क्रिकेट करीयर फ्लॉप झाले.

पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की एवढे असून सुद्धा त्याचे एका महाराणी सोबत लग्न झाले. आज आम्ही ज्या क्रिकेटर बद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे श्रीसंत !

आयपीएल दरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे श्रीसंत चे संपूर्ण क्रिकेट करीयर बरबाद झाले होते. त्यानंतर श्रीसंत ने १३ डिसेंबर २०१३ ला जयपूर येथील शेखावत परिवाराची राजकुमारी भुवनेश्वरी सोबत लग्न केले होते. भुवनेश्वरी सोबत श्रीसंत चे लग्न एकदम शाही थाटामाटात झाले होते.


त्यावेळी श्रीसंत च्या लग्नात अनेक साऊथ च्या सुपर स्टार्स सोबतच अनेक राजकीय नेते सुद्धा आले होते. श्रीसंत ची पत्नी भुवनेश्वरी जयपूरच्या राजपूत घराण्यातील आहे. ती तेथील राजकुमारी आहे.

श्रीसंत आणि भुवनेश्वरीला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले सुध्दा आहेत. श्रीसंत नेहमी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरुन त्याच्या मुलांसोबत वेळ घालवतानाचे फोटो शेअर करत असतो.

क्रिकेट करियर बंद झाल्यावर श्रीसंत ने टोलिवूड मध्ये एक अभिनेता म्हणून नशीब अजमावून पाहिले. साऊथ कडील ३/४ चित्रपटांत त्याने काम सुद्धा केले आहे. त्यानंतर श्रीसंत कलर्स वाहिनीवरील बिग बॉस सिझन १३ चा स्पर्धक सुद्धा होता.

या शो मध्ये तो टॉप ५ मध्ये निवडला सुद्धा गेला होता मात्र शेवटच्या क्षणाला ट्रॉफी त्याच्या हातून निसटली. लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *