बॉलिवुड कलाकार हे त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांची गडगंज संपत्ती तसेच त्यांची प्रॉपर्टी यासाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यातील अनेक कलाकार त्यांची घरे भाड्यानेसुद्धा देतात. त्याद्वारेपण ते हजारो लाखो रुपयांची कमाई करत असतात. तर आता काजोलसुद्धा तिच्या घरावरुन चर्चेत आली आहे. काजोलने तिचे पवईतील घर भाड्याने दिले आहे. त्यासाठी ती महिना ९० हजार रुपये भाडे घेणार आहे.
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार काजोलने ३ डिसेंबरला तिचा पवईतील फ्लॅट रेंट एग्रीमेंटसाठी रजिस्टर केला. काजोलचा तो फ्लॅट ७७१ स्केअर फुटांचा असुन पवईतील हिरानंदानी गार्डनच्या अटलांटिक प्रोजेक्टच्या २१ व्या मजल्यावर आहे.
सध्या या घराचे भाडे ९० हजार असले तरी एका वर्षानंतर ते दर महिना 96,750 रुपये होईल. सध्या काजोल तिच्या कुटुंबासोबत जुहु येथील शिवशक्ती बंगल्यात राहते. त्यांच्या या बंगल्याची किंमत ६० करोड रुपये आहे. त्यांचा हो बंगला 590 स्क्वेअर फुटमध्ये वसला आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी अभिनेत्री कृती सेनन ने महानायक अमिताभ बच्चन यांचा फ्लॅट १० लाखांना भाड्याने घेतला याची चर्चा होती. बिगबींचा तो ड्युफ्लेक्स फ्लॅट अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला मध्ये अल्टेंटिस बिल्डिंच्या २७ आणि २८ व्या मजल्यावर आहे.
क्रितीने अमिताभ यांचे डुप्लेक्स अपार्टमेंट २ वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे. यासंदर्भातील लीव एंड लाइसेंस एग्रीमेंट १२ नोव्हेंबरला झाले होते. या एग्रीमेंट कागदपत्रांनुसार १६ ऑक्टोबर २०२१ ते १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत भाडेतत्वाचा कालावधी आहे. या डुप्लेक्स अपार्टमेंटसाठी क्रिती १० लाख रुपये दरमहा देणार आहे.
ही प्रोपर्टी अमिताभ यांनी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात क्रिस्टल ग्रुप द्वारे अटलांटिसमध्ये ५१८४ स्केअर फुटांची प्रॉपर्टी ३१ करोड रुपयांना खरेदी केली होती. या प्रोपर्टीला या वर्षींच एप्रिलमध्ये रजिस्टर केले गेले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !