कोराना महामारीमुळे गेली २ वर्षे चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद होती. त्यामुळे अनेक सिनेमे , नाटक यांचे प्रदर्शन लांबणीवर गेले. तर काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. आता पुन्हा एकदा चित्रपटगृहे, नाट्यगृहे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहेत त्यामुळे प्रेक्षकांची पावले सुद्धा तिथे वळताना पाहयला मिळतात. त्यातीलच बॉलिवुडचा बहुचर्चित 83 हा चित्रपट येत्या २४ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह भारतीय क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन कपिल देव यांची भुमिका साकारणार आहे. भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वा खाली लॉर्डस् मैदानात वेस्टीइंडीज विरोधात सामना जिंकुन पहिला विश्वचषक जिंकला होता. कबीर खान यांच्या दिग्दर्शनात तयार होणारा हा चित्रपट भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे.
या चित्रपटात सुनील गावस्कर यांची भुमिका ताहिर राज भसीन, यशपाल शर्मा यांची जतिन सरना, मोहिंदर अमरनाथ यांची साकिब सलीम, रवि शास्त्री यांची धैर्य करवा, के श्रीकांत यांची जीवा, मदन लाल यांची हार्डी संधू, बलविंदर सिंह यांची एमी विर्क, सैयद किरमानी यांची साहिल खट्टर, संदीप पाटिल यांची चिराग पाटिल, दिलीप वेंगसरकर यांची आदिनाथ कोठारे, कीर्ति आजाद यांची दिनकर शर्मा, रोजर बिन्नी यांची निशांत दहया साकारत आहे. याव्यतिरिक्त दिग्गज कलाकार पंकज त्रिपाठी संघाचे मॅनेजर पीआर मान सिंह यांची भुमिका साकारत आहे.
या चित्रपटाच्या निर्मात्यांनी भारतीय खेळाडुंना १५ करोड रुपये दिल्याचे म्हटले जाते. Bollywood Hungama.com ने दिलेल्या माहितीनुसार कपिल देव यांना त्यांची कहाणी सांगण्यासाठी ५ करोड रुपये मिळाले आहेत. एखादा चित्रपट बनवते वेळी त्याच्या विषयानुसार पडद्यावर वास्तविक घटना दाखवते वेळी खेळाडुंची वैयक्तिक माहिती मिळवणे महत्वाचे होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन १९८३ च्या विजेत्या संघाला १५ करोड रुपये देण्यात आले. यात सर्वाधिक रक्कम ५ करोड ही कपिल देव यांना मिळाली.
गेल्या आठवड्यात दुबईच्या बुर्ज खलिफा वर या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला. त्यावेळी तिथे रणवीर, दिपिका आणि कबीर सिंह तिथे उपस्थित होते. या चित्रपटाचा प्रिमियर रेड सी फेस्टिवलमध्ये केला गेला. त्यावेळी तिथे रणवीर, दिपिका ,कबीर सिंह त्यांची पत्नी मिनी माथुर, कपिल देव आणि त्यांची पत्नी रोमी उपस्थित होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !