Headlines

कॅटरिना कैफ सारखी फिगर पाहिजे, मग फॉलो करा तिचा आहार आणि तंदुरुस्त राहण्याची पद्धत !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुंदर आणि तंदुरुस्त अभिनेत्रींच्या ओळीत कतरीना कैफचे देखील आहे. जी आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सुंदर शरीरठेवणीने सर्वांना मोहवून टाकते. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक खान, हृतिक रोशन आणि अक्षय कुमार अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत तिने काम केले आहे. कतरीना आपल्या तंदुरुस्तीकडे प्रचंड लक्ष देते यामुळेच तिचा खऱ्या वयाचा अंदाज येतं नाही. शरीराच्या तंदुरुस्तीमध्ये कतरीना आजकालच्या तरुण अभिनेत्रींना देखील मात देते. तर मग पाहूया काय आहेत कतरिनाच्या तंदुरुस्तीचा गुपित.
कतरीना तिचा व्यायामासाठीची रूपरेषा स्वतःच तयार करते. कतरिनाच्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, आठवड्यातील सातही दिवस ती कमीत कमी एक ते तीन तास व्यायाम करते. त्याखेरीज तिने हेही सांगितलं की तिला स्वतःला आव्हान द्यायला आवडते, त्यामुळे ती स्वतःच्या व्यायामाची रूपरेषा स्वतः तयार करते.
आपल्या व्यायामामध्ये ती स्कॉट्स आणि पुशअप्स यांचा आवर्जून समावेश करते. सोबतच ती योगा देखील करते. व्यायामामध्ये विविध प्रकारांचा समावेश असतो. जसे की कार्डियो, वेट ट्रेनिंग, टीआरएक्स, बोसू बॉल, केट्टलबेल्स आणि पावरप्लेट्स. हे प्रकार कतरीना व्यायाम करताना करते.
कतरिना कैफ ही अगदी कठोरपणे संतुलित आहार घेणे पसंद करते. दुधापासून तयार झालेले पदार्थ ग्लुटेन किंवा रिफाइंड असलेले पदार्थ कतरीना खाणे टाळते. सकाळी उठल्यानंतर ती चार ग्लास गरम पाणी पिते. दर दोन तासाने ती उकळवलेल्या भाज्या आणि फलाहार घेते. नाश्त्यासाठी ती सेरेल्स, दलिया असे पौष्टिक पदार्थ खाते. दुपारच्या जेवणासाठी कतरीना हिरव्या भाज्या, मासे असे जेवण करते. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ब्रेडसोबत पीनट बटर खाणं ती पसंद करते तर रात्रीच्या जेवणासाठी सूप, मासे, कोशिंबीर असा आहार घेते.
ती नेहमी स्वतःला हाइड्रेटेड ठेवते. जर का तुम्ही या सगळ्या गोष्टी नीट समजून अंगिकारल्या तर नक्कीच तुम्ही कतरीना सारखे तंदुरुस्त व्हाल. येत्या 24 मार्चला कतरिनाचा “सूर्यवंशी” चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे. त्या चित्रपटामध्ये कतरीना कैफसोबत अक्षय कुमार देखील दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *