Headlines

श्रद्धा कपूरच्या आई-वडिलांनी पळून जाऊन केले होते लग्न, जाणून घ्या काय होते कारण !

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकतीच ३३ वर्षाची झाली. श्रद्धा कपूरचा चाहते वेगवेगळ्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. श्रद्धा कपूरचा बागी ३ हा चित्रपट येत्या ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यामुळे एकीकडे वाढदिवसाचे निमित्त आणि दुसरीकडे प्रदर्शनासाठी येऊ घातलेल्या चित्रपट या दोन्ही कारणांमुळे श्रद्धा चर्चेत आहे. आशिकी २, एक विलन, बागी, आणि एबीसीडी २ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून इंडस्ट्रीमध्ये श्रद्धाने तिची वेगळी ओळख बनवली आहे.
२०१० मध्ये आलेल्या तीन पत्ती या चित्रपटातून श्रद्धाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मागील दहा वर्षात श्रद्धाने बॉलिवूडमध्ये तिची चांगली ओळख निर्माण केली आहे. श्रद्धा ही शक्ती कपूरची मुलगी असून देखील तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली हे विशेष!
श्रद्धा कपूर चा जन्म ३ मार्च १९८७ मध्ये झाला. श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर हे 80 व 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता होते. तिच्या वडिलांना सारखेच तिची आई शिवांगी कपूर ने देखील चित्रपटांमध्ये काम केले आहे हे खूप कमी लोक जाणतात. १९८० मध्ये आलेल्या किस्मत या चित्रपटांमध्ये शिवांगी कपूर ने काम केले होते. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि रंजिता प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात शक्ती कपूर ने देखील काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आणि शक्ती कपूरच्या प्रेम कहानीस सुरुवात झाली.
या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले परंतु श्रद्धा कपूरचे आजोबा या लग्नास राजी नव्हते. ते या लग्नाच्या विरोधात होते. कारण शक्ती कपूर पंजाबी होते आणि शिवांगी मराठी कुटुंबातील होत्या. यामुळेच शिवांगी च्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. म्हणून त्यावेळी शक्ती कपूर आणि शिवांगी यांनी घरून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. वडिलांचा विरोध असून देखील १९८२ मध्ये शिवांगी ने शक्ती कपूर सोबत लग्न केले. त्यावेळी श्रद्धा कपूरची आई म्हणजेच शिवांगी कपूर केवळ 18 वर्षांची होती.
शक्ती कपूर सोबत लग्न झाल्यावर चित्रपटांमध्ये काम करणे बंद करून एक गृहिणी म्हणून जीवन जगणे पसंत केले. शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर यांना दोन मुले आहेत. १९८४ मध्ये सिद्धांत कपूर चा जन्म झाला आणि १९८७ मध्ये श्रद्धा कपूर चा जन्म झाला. पद्मिनी कोल्हापुरे या शिवांगी कपूर च्या लहान बहिण आहेत. श्रद्धा कपूर हिने तिच्या मावशीकडून म्हणजेच पद्मिनी कडून प्रेरणा घेऊन सिने इंडस्ट्रीत पाऊल टाकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *