क्रिती सेनॉन सध्या तिच्या ‘भेडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत असतानाच दुसरीकडे, ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास आणि क्रिती यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. प्रभासने क्रितीला प्रपोज केलं असून हे दोघं लवकरच साखरपुडा करणार आहेत, अशा चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत.
शिवाय काही दिवसांपूर्वीच अभिनेता वरुण धवन याने देखील क्रिती आणि प्रभासमध्ये काहीतरी सुरु असल्याचे संकेत दिले होते. अशातच हे दोघे लवकरच साखरपुडा करणार असल्याची बातमीसुद्धा समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आदिपुरुषच्या सेटवर क्रिती सेननला प्रभासने गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. आणि तिने सुद्धा अभिनेत्याला होकार दिला होता. दोघांचेही कुटुंबिय या नात्यामुळे खूप खुश आहेत. आता हे दोघे त्यांच्या नात्यात आणखी पुढे जाऊ इच्छितात. आदिपुरुष प्रदर्शित झाल्यावर हे दोघे साखरपुडा करणार असल्याचे बोलले जात आहे.
Officially Confirmed ! #Prabhas proposed #KritiSanon during shoot of #Adipursh ! They are in relationship now !!! Engagement on the way very soon 🔥🕺🏻🕺🏻❤️❤️
— Umair Sandhu (@UmairSandu) November 28, 2022
करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमधून क्रिती आणि प्रभासच्या अफेअरना उधाण आले होते. या शोमध्ये एका सेगमेंटमध्ये क्रितीने प्रभासला फोन केला होता. याशिवाय एका मुलाखतीत क्रितीने मला प्रभाससोबत लग्न करायला आवडेल असेही म्हटले होते. या दोघांनीही अधिकृतरित्या आपल्या नात्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
क्रिती आणि प्रभासची जोडी पहिल्यांदाच आदिपुरुष या चित्रपटातून एकत्र समोर येणार आहे. ओम राऊत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र चित्रपटाच्या व्हिएफेक्सवर प्रेक्षक नाराज झाले आहेत. हा चित्रपटा जून 2023 मध्ये प्रदर्शित होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !