Headlines

अशी होती अजय देवगन आणि काजोलची लव स्टोरी !

अजय देवगन आणि काजोलया दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र बघण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. यावर्षी प्रदर्शित झालेला तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटामध्ये दोघे तब्बल अकरा वर्षांनी एकत्र दिसले होते. अजय आणि काजोलची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप पसंतीस पडली. काजोल आणि अजय च्या जोडी वर लोक खूप प्रेम करतात. ही जोडी एक आदर्श जोडी मानली जाते. हल्लीच काजल आणि अजयच्या रिलेशनशिप आणि लग्ना बद्दलच्या काही गोष्टी उघडकीस आल्या. हल्लीच काजोलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली. त्यात तिने तिच्या जीवनात संबंधित काही किस्से सांगितले.
ती आणि अजय २५ वर्षांपूर्वी हलचल या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. त्यावेळी मी कोणाला तरी विचारले की हिरो कुठे आहे आणि त्या व्यक्तीने अजय कडे इशारा केला. तेव्हा अजय एकदम कंटाळून एका कोपऱ्यात बसला होता. त्याला मी दहा मिनिटे आधीच बघितले होते आणि त्याच्याबद्दल नकारार्थी बोलायला सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू आमच्यातील बोलले वाढत गेले आणि आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. तेव्हा मी एका वेगळ्या व्यक्तीला डेट करत होती आणि तोही एका वेगळ्या मुलीला डेट करीत होता. त्यानंतर आमच्या दोघांचा ही आमच्या पार्टनर सोबत ब्रेक-अप झाला. मी आणि अजयने कधीच एकमेकांना प्रपोज केले नाही. कारण आम्हाला माहित होते की आम्ही एकत्रच आहोत.
काजोल ने सांगितले की ते दोघे डिनर आणि लॉंग ड्राइव्हला खूप वेळा एकत्र जायचे. दक्षिण मुंबईत राहायची आणि अजय जुहू ला. आमचे अर्धे रिलेशनशिप तर कारमध्येच गेले आहे. माझ्या मित्रांनी मला अजय विरुद्ध भडकवले होते परंतु माझ्यासाठी अजय तसा नव्हता. लग्ना बद्दल बोलताना काजोल म्हणाले की, मी आणि अजयने एकमेकांना चार वर्षे डेट केले. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी अजयचे आई-वडील राजी होते. मात्र माझ्या बाबांनी माझ्याशी चार दिवस अबोला धरला होता. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची इच्छा होती परंतु माझाही निर्णय झाला होता. आम्हा दोघांना माहीत होते की आम्हाला एकत्र जीवन जगायचे आहे. आम्ही पंजाबी आणि मराठी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले.
काजल ने हेही सांगितले की त्यांनी घरातच लग्न केले होते परंतु मीडियाला चुकीचा पत्ता दिला होता. कारण हा दिवस आम्हा दोघांना फक्त आमच्यासाठीच हवा होता. मला अजूनही आठवते की फेरे घेतेवेळी अजय ते पटापट संपवावेत या घाईत होता. यासाठी त्याने भटजींना लाच देखील दिली होती. काजोल ने सांगितले कि ती कभी खुशी कभी गम या चित्रपटादरम्यान गर्भवती होती. परंतु काही कारणास्तव तिचे मिसकॅरेज झाले. त्यावेळी तो चित्रपट खूप चालला परंतु तो काय माझ्यासाठी तितका चांगला नव्हता. कारण त्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये होते.

त्यानंतर पुन्हा एकदा माझे मिसकॅरेज झाले. ही माझ्यासाठी खूपच दुःखद गोष्ट आहे. तो काळ माझ्यासाठी खूपच कठीण होता. परंतु आता आम्हाला न्यासा आणि युग अशी दोन मुले आहेत. आता आमचा परिवार पूर्ण झाला आहे. मी आणि अजय दोघेही फारसे रोमांटिक नाही. परंतु आम्ही एकमेकांची खूप काळजी घेतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *