एका इंस्टाग्राम पोस्टसाठी एवढे करोडो रुपये घेतात हे दोन भारतीय दिग्गज !

359

आजकाल सर्व सिनेस्टार सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह राहायला लागले आहेत. ही कलाकार मंडळी काय करतात, कुठे जातात, त्यांच्या आयुष्यात काय घटना घडतात हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कळत असते. इंस्टाग्राम सारख्या माध्यमांवर तर आता सर्वच कलाकार मंडळी आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका रिपोर्टनुसार दुनियाभरचे कलाकार मंडळी इंस्टाग्राम वर पोस्ट टाकण्यासाठी किती रुपये घेतात याची माहिती समोर आली. गेल्या वर्षी सुद्धा हा अहवाल प्रसिद्ध झाला होता. यावर्षी सुद्धा एका कंपनीने इंस्टाग्राम वर पोस्ट टाकण्यासाठी कलाकार मंडळी किती रुपये घेतात हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
या लिस्टमध्ये जगभरातील प्रसिद्ध कलाकारांचे नाव सहभागी आहेत जे एका पोस्टसाठी करोडो रुपये फी घेतात. या लिस्टमधील २ भारतीय कलाकारांचे नाव सुद्धा शामिल आहे. ज्यात पहिले नाव प्रियंका चोप्राचे तर दुसरे भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहलीचे आहे.

या लिस्टमध्ये प्रियंका चोपडा चे नाव १९ व्या स्थानावर आहे तर विराट कोहलीचे नाव २३ व्या स्थानावर आहे. सब सेक्शनमध्ये प्रियंका चोप्राचा नंबर १६ वा आहे. या लिस्ट नुसार प्रियंकाचे ४,३०,३८,३४३ फॉलोवर्स आहे आणि ती प्रत्येक पोस्टसाठी २७१,००० डॉलर्स म्हणजेच भारतीय चलना नुसार १,८६,९८,३९० रुपये चार्ज करते. प्रियंका चोपडा नेहमीच कोणत्या ना कोणत्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी इंस्टाग्राम वर पोस्ट टाकत असते. त्यामुळे स्थित एका इन्स्टा पोस्टसाठी १.८७ करोड रुपये घेते. प्रियंकाचे इंस्टाग्राम वर ४३.३ मिलियन हून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ती इंस्टाग्राम द्वारे भरगोस पैसे कमवीत असते.
या लिस्टमध्ये प्रियंका ही एकमेव भारतीय कलाकार आहे. विराट कोहली बद्दल बोलायचे झाल्यास, त्याचे इंस्टाग्रामवर ३६,१५९,७७६ फॉलोवर्स आहे आणि तो प्रत्येक पोस्ट साठी १,९६,००० डॉलर्स फी घेतो. म्हणजेच भारतीय चलना नुसार विराट कोहली एका पोस्टसाठी १.३५ करोड रुपये फि घेतो. विराट इंस्टाग्राम वर ३८.२ मिलियन हून अधिक फॉलोअर्स आहेत. या संपूर्ण लिस्ट मध्ये काइली जेनर हिचा प्रथम क्रमांक लागतो. ती तिच्या प्रत्येक पोस्ट साठी ८.७३ करोड रुपये फी घेते. काइली नंतर एरियाना ग्रांड, क्रिस्तियानो रोनाल्डो आणि सेलेना गोमेज या सेलिब्रिटीज चा नंबर लागतो.