अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा दुसऱ्यांना बनली आई, पहा मुलीचा पहिला फोटो !

1654

बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा च्या घरून एक गोड बातमी कानी पडली आहे. ही गोड बातमी म्हणजेच शिल्पा शेट्टी कुंद्रा दुसऱ्यांदा आई बनली आहे. यावेळी तिला कन्यारत्नाचा लाभ झाला असून शिल्पा आणि तिच्या मुलीचा फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर करुन तिच्या फॉलोवर्सना ही गुड न्यूज दिली. शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती च्या मुलीचे नावही सांगितले.‌ १५ फेब्रुवारी २०२० ला शिल्पाला मुलगी झाली. शिल्पाने त्याच्या मुलीचे नाव समिशा शेट्टी कुंद्रा असे ठेवले आहे. शिल्पाने शेअर केलेला इंस्टाग्राम वरील पोस्ट वर तिच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी शिल्पाने दुसऱ्यांदा आई बनण्यासाठी सरोगसीचा मार्ग निवडला.
शिल्पाला याआधी एक मुलगा आहे. शिल्पा च्या मुलाचे नाव विहान कुंद्रा असे असून तो आता सात वर्षाचा झाला आहे. त्यानंतर सात वर्षांनी शिल्पाने पुन्हा आई बनवण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट तिने सर्वांपासून गुपीत ठेवून दिली होती. शिल्पाने अजून पर्यंत त्याच्या मुलीचा चेहरा दाखवला नाही परंतु तिचा हात पकडताना चा एक गोड फोटो शेअर केला आहे. ज्यात छोट्या समिशाने शिल्पाचा हात पकडून ठेवला आहे.
या फोटोमध्ये कॅप्शन द्वारे शिल्पाने असे लिहिले आहे की ‘ ओम श्री गणेशाय नमः देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि आमच्या घरात एका छोट्या परीला पाठवले. या सर्व चमत्कारामुळे आम्ही खूपच रोमांचित झालो असून देवाचे मनापासून आभार मानतो.

शिल्पाने तिच्या मुलीचे नाव समिशा असे सांगून त्या नावाचा अर्थ देखील सांगितला आहे. तिने लिहिले आहे की, समिशा ही घरातील ज्युनियर एसएसके आहे. संस्कृत मध्ये स म्हणजे ‘प्राप्त होणे’ आणि मिशा या शब्दाचा अर्थ रशियन भाषेत ‘जो देवासमान असतो तो’ असा आहे. समिशा ही आमच्या घरासाठी अगदी अशीच आहे. ती आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली आणि आमचा परिवार पूर्ण केला.