Headlines

अभिनेत्री महिमा चौधरीने सांगितली बॉलिवूड मधील काळ्या धंद्याची गोष्ट, अभिनेत्रीला किस केला तरी … !

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी ही एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने परदेस या चित्रपटातून आपल्या करीअरची सुरुवात केली होती. पहिल्याच चित्रपटामुळे ती रातोरात स्टार बनली. या चित्रपटानंतरसुद्धा ती काही चित्रपटांमध्ये दिसली होती.

पण नंतर कालांतराने ती लाइमलाइटपासून दुरावली. पण अनेकदा ती वेगवेगळ्या विषयांवर आपले मुद्दे मांडत असते. एवढंच नव्हे तर तिने एकदा बॉलिवूडवर आरोपदेखील केलेला.

महिमाने एका मुलाखतीत इंडस्ट्रीत अभिनेत्रींसोबत कसे मतभेद होतात ते सांगितले. महिमा म्हणाली की, सध्या इंडस्ट्रीत अभिनेत्रींना चांगल्या संधी दिल्या जात आहेत. त्यांना जास्त पैसे आणि जास्त जाहिराती मिळत आहेत. पूर्वीच्या मानाने आताच्या अभिनेत्रींची स्थिती खूपच सुधारली आहे.

महिमा पुढे म्हणाली की, पूर्वी एखादी अभिनेत्री कोणाला डेट करत असेल तर त्याची चर्चा व्हायची. आणि त्यात जर तुम्ही लग्न केले असे इंडस्ट्रीत समजले तर मग तुम्हाला बाजूला फेकले जायचे. कारण तेव्हा अभिनेत्रीने कोणालाच साधे किस सुद्धा केलेली नसावी अशाच अभिनेत्रींची मागणी होती. आणि तुमचे लग्न झाले असेल तर तुमचे करीअर संपले आणि त्यात जर तुम्हाला मुलं झाले तर तुमचे फिल्मी करीअर पूर्णच बंद व्हायचे.

महिमा चौधरीने 2006 मध्ये बिझनेसमन बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले आणि काही काळानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. पण लग्नाच्या काही वर्षांनी बॉबी आणि महिमा यांचा घटस्फोट झाला. सध्या ती एकटीने आपल्या मुलीला वाढवत आहे. आता ती कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाद्वारे चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !