अभिनेत्री मलायरा अरोरो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायकाच्या फिटनेसमुळे तिच्या वयाचा अंदाज घेता येत नाही पण ती सध्या 48 वर्षांची आहे. नुकतेच सोशल मीडियावर मलायकाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्या फोटोत तिने नक्की काय घातले हेच समजत नाही असे युजर्सचे म्हणणे आहे.
फोटोत मलायकाने स्किन कलरचा टाइट वन पीस घातला आहे. त्यावर तिने डेनिम जॅकेट नुसते खांद्यावर घेतले आहे. आणि डोळ्यांवर गोगल घातला आहे. केस साधे बांधले दिसतात. तिने पापारझीकडे पाहून हात सुद्धा दाखवला.
मलायका तिच्या लूक आणि बोल्ड आउटफिटमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मलायका फैमिना मिस इंडियामध्ये खूप बोल्ड आणि ट्रान्सपरंट गाउनमध्ये दिसली होती.
मलायकाचे लेटेस्ट फोटो खारच्या एक्सीड ऑफिस बाहेर काढले होते तिथे तिने स्किन कलरचे कपडे घातले होते. मलायकाचे ते कपडे पाहून तिने नक्की काय घातले आहे असे म्हणत चकित होत आहे. मलायकाचे ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून काहीजण तिच्या फिगरचे कौतुक करत आहेत तर काहीजण तिला ट्रोल करत आहेत.
मलायका आजकाल खूपच बोल्ड आणि सेक्सी कपड्यांमध्ये दिसते त्यामुळे तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. एका यूजरने तिला त्या फोटोवर कमेंट तू कपडे तरी घातले आहेस का असे विचारले.
मलायका काही दिवसांपूर्वी मुंबईत आयोजित केलेल्या फॅमिना मिस इंडिया 2022 मध्ये परीक्षक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी तिने सोनेरी रंगाचा ट्रान्सपरंट गाउन घातला होता. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले.
मलायका सध्या तिच्या आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत असते. दोघेही खुलेआम त्याच्या प्रेमाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. काही दिवसांपूर्वीच मलायका आणि अर्जुन पॅरिसला अर्जुनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. त्यांचे पॅरिसमधील फोटो सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. अरबाज खानशी घटस्फोट झाल्यावर मलायका अर्जुनच्या प्रेमात पडली. ती त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !