जुनं ते सोनं हि म्हण आपल्याकडे सर्वाना माहिती आहेच. याची प्रचिती आज आपल्या सर्वांना येत आहे. आज जगात आणि भारतात कोरोना सारख्या महामारीचा प्रसार फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणून सगळीकडे बंद पाळण्यात आला आहे पण या लॉक डाउनमध्ये लोकांना घरी बसून सुवर्ण दिवस आले आहे असे म्हणण्यास हरकत नाही कारण लोकांची आवडती मालिका रामायण हि नव्याने सुरु झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या भावनांना उजाळा मिळत आहे.
रामानंद सागर यांची रामायण हि मालिका पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. लॉकडाऊनमुळे दूरदर्शनने पुन्हा एकदा या लोकप्रिय मालिकेचे प्रसारण सुरू केले आहे. अशा परिस्थितीत सुद्धा आधी रामायण पाहिले जायचे तसेच आता सुद्धा हा कार्यक्रम पाहिला जातोय. पुन्हा एकदा रामायण सुरू झाल्यापासून यामध्ये काम करणारे सर्व तारेही माध्यमांच्या बातम्यांचा भाग होऊ लागले आहेत.
त्या काळात रामायणात काम करणारे कलाकार सध्या काय करीत आहेत आणि त्यांचे आयुष्य कसे जगत आहेत याविषयी लोकांच्या मनांत उत्सुकता निर्माण होताना पाहायला मिळत आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला रामायणातील रावणची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणार्या अभिनेत्रीबद्दल काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत.
अपराजिता भूषण या ह्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी ८०च्या दशकात रामायणातील रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारली होती. रामानंद सागर यांनीअपराजिताला मंदोदरीची भूमिका करण्यासाठी त्यांची निवड केली होती.
हे वाचा – रामायणातील या ५ कलाकारांनी घेतला आहे जगाचा निरोप, पहा आणखी कोण आहेत !रावणाची पत्नी होण्यासाठी ऑडिशन घेतल्यानंतर रामानंद सागर यांनी अपराजिता यांना सांगितले की,” बर्याच लोकांचे ऑडिशन घेतल्यानंतर शेवटी माझा शोध आता पूर्ण झाला आहे.” रामायणात काम केल्यानंतर अपराजिता यांचे भाग्यच उजळून गेले. या कार्यक्रमानंतर त्यांनी जवळपास ५० बॉलिवूड चित्रपटांत काम केले.
अपराजिता अखेर आपणास ‘गुप्त’ चित्रपटात दिसल्या होत्या. १९९७ ला आलेल्या या चित्रपटात बॉबी देओल, मनीषा कोईराला आणि काजोल मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट करून अपराजिता अध्यात्माकडे वळल्या. यामुळेच अपराजिता सध्या “आर्ट ऑफ लिव्हिंग” संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत.
हे वाचा – रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची संपत्ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल !अपराजिता यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल काही बोलले तर त्यांचे वडील भारत भूषण हे बॉलीवुडमध्ये दिग्गज असे अभिनेता होते. अपराजिता यांचा आईचे नाव सरला भूषण होते. त्यांना एक बहीण सुद्धा आहे त्यांचे नाव अनुराधा भूषण आहे. अपराजिता यांना दोन मुले आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी अभिनयातून संन्यास घेतला. यानंतर त्या अध्यात्माकडे वळल्या.
हे वाचा – रामायण मधील सीता आत्ता काय करते बघा, आणि पहा तिचे आत्ताचे फोटोज !विशेष म्हणजे आजकाल देशात लॉकडाऊन सुरू आहेत आणि सर्व लोकांना त्यांच्या घरात राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत रामायण पुन्हा प्रसारित केले जावे अशी मागणी लोकांद्वारे करण्यात आली यानंतर, दूरदर्शनने रामायण, महाभारत, शक्तीमान आणि द जंगल बुक सारख्या कार्यक्रमांचे प्रसारण सुरू केले.
हे वाचा – रामायण सिरीयल मधील शूर्पणखाचे नाक कापते वेळी सेटवर झाला होता हा गमतीदार किस्सा !रामायण प्रसारित झाल्यानंतर या कार्यक्रमाच्या टीआरपींनी गगनाला स्पर्श केला. त्यामुळे अचानक दूरदर्शन वाहिनीचे महत्व देखील वाढले आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर, पूर्वीच्या काळात रामायण प्रसारित होत असतांना रस्ते ओसाड असायचे. तेव्हा तर घरात टीव्हीदेखील नसायचा .ज्याच्या घरी टिव्ही असायची अश्या लोकांकडे गर्दी पाहायला मिळायची आणि तिथे लोक रामायण पाहायला जमायचे.
हे वाचा – रामायण मालिकेतील या कलाकारांचे झाले निधन, लॉक डाऊन मुळे ही येत आहे अडचण !
तसेच रामायणातील आपला आवडता कलाकार कोण आहे? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्याला ही माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका.